एक पणती व्यसनमुक्तीसाठी

43
✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.15नोव्हेंबर):-देशाची नवी पिढी व्यसनमुक्त राहावी तसेच युवकांनी व्यसनापासून दूर राहावे म्हणून या दिवाळीत लक्ष्मीपूजन चे औचित्य साधून एक पणती व्यसनमुक्तीसाठी लावून स्वतःचे व राष्ट्राचे हित जोपासावे. आज अनेक तरुण बांधव व्यसनाच्या आहारी जात आहेत. या व्यसनाने आपण आपला जीव गमाऊ शकतो. आपल्या कुटुंबात आपले अस्तित्व खूप मोठे आहे. व्यसन केल्यामुळे कर्करोग सारखा महाभयंकर आजार होऊ शकतो. अशा दुर्धर आजारापासून दूर राहण्यासाठी व्यसन करणाऱ्या सर्व बांधवांनी या दिवाळीत नरक चतुर्दशी दिवशी ‘व्यसन’ या राक्षसाचा एक पणती लावून वध करूयात.

“एक पणती व्यसनमुक्ति साठी”उपक्रमाचे आवाहन शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्यामार्फत करण्यात आले.सध्या अनेक कारणांनी युवक व्यसनाकडे आकर्षित होत आहेत. ही राष्ट्राच्या दृष्टिने चिंतेची बाब आहे.असे युवक व्यसनापासुन दूर रहावेत म्हणून दीपावली काळात “एक पणती व्यसनमुक्तिसाठी” या उपक्रमाचे आवाहन करण्यात आले.कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम जनतेसही सदर चे आवाहन तंबाकू मुक्तशाळा जिल्हा समन्वयक एकनाथ कुंभार यानी केले. त्यानुसार ठीक ठिकाणी आकर्षक रांगोळी काढून एक पणती व्यसन मुक्ति साठी असा उल्लेख करण्यात आला.
काही ठिकाणी पणत्या व आकर्षक दिव्यांची आरास करण्यातआली.व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारी घोष वाक्ये लिहिली होती.सर्व सुजान तरुण वर्गाना विनंती आहे की,आपण व्यसनाच्या आहारी जाऊ नये,वेळीच सावध होऊन व्यसन जडल्यास या दिवाळी मधे एक पणती व्यसनमुक्तिसाठी लाऊन निर्धार करून आपले व्यसन सोडून द्यावे.तुम्हीच उद्याचे या देशाचे शिल्पकार आहात.हा यशोरथ आपणच पुढे ओढणार आहात. उद्याचा भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी आपण सर्वानी या मंगल प्रसंगी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन व्यसनमुक्त भारत घडवूया अशी विनंती कुंभार यानी केली.
तसेच एक पणती व्यसनमुक्तीसाठी या उपक्रमास जिल्हाधिकारी दौलत देसाई, जि.प. कोल्हापूर चे मुख्यकार्यकारी अधिकारी अमन मित्तल ,शिक्षणाधिकारी आशा उबाळे, सर्व शिक्षा कार्यक्रम अधिकारी शशिकांत कदम,करवीर चे गट शिक्षकणाधिकारी शंकर यादव, विस्तार अधिकारी डी.ए.पाटिल, विश्वास सुतार यांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले.नवतरुण युवकांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. व्यसनाच्या आहारी जात असल्यास त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास नक्कीच त्यांच्यात सुधारणा होऊ शकते.
याची जाण व भान ठेवून सद्सद्विवेक बुद्धीने लोकांनी नवतरुणांना वेळीच आवरले पाहिजे. होणाऱ्या नुकसानीची जाणीव करून दिली पाहिजे. म्हणूनच यावेळी व्यसनमुक्त होण्यासाठी या दिवाळीत एक पणती प्रज्वलित करून व्यसनमुक्तीचा निर्धार करूयात आणि उज्वल भारत घडवूयात. असे उद्गार शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी काढले. तसेच तरुण वर्गाला मार्गदर्शन केले. अशाप्रकारे भारतातील युवक आणि येणारी नवीन पिढी ही 100% व्यसनमुक्त रहावी. यासाठी शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्यामार्फत एक पणती व्यसनमुक्तीसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच नरक चतुर्दशी दिवशी व्यसन या राक्षसाचा वध करूया आणि उज्वल भारत घडवूया या जयघोषाने हा उपक्रम पार पडला.