टेराकोटाच्या पणत्यांमुळे मातीच्या पणत्या नामशेष

42

🔸कुंभार व्यावसायिकही विकतायेत टेराकोटाच्याच पणत्या

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.15नोव्हेंबर):- दिपावली दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो.जास्तीत जास्त दिवे लावून परिसर प्रकाशमय केल्या जातो.यासाठी पणत्या लागतात.पारंपरिक पद्धतीने वापरात असलेल्या मातीच्या पणत्यांची आकर्षक दिसणा-या टेराकोटाच्या पणत्यांनी जागा घेतली असल्याचे शहरात बाजारात विक्रीस आलेल्या टेराकोटाच्या पणत्यावरून दिसून येते.टेराकोटाच्या पणत्या दिसण्यास आकर्षक दिसून येत असल्याने कुंभारांनी बनविलेल्या पणत्या विक्रीवर परिणाम झालेला दिसून येत आहे.यामुळे अनेक कुंभारांनी सुद्धा विविध ठिकाणाहून टेराकोटाच्या पणत्या आणून त्याची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.

दिपावलीनिमित्त शहरातील बाजारपेठेत गर्दी वाढत असून दिवाळीसाठी लागणारे साहित्यांची दुकानेही मोठ्या प्रमाणात लागण्यास सुरुवात झाली आहे.शहरातील मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत विविध आकारांसह रंगीबेरंगी टेराकोटाच्या पणत्या बाजारात विक्रीस आल्याअसुन या पणत्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.गत दोन ते तीन वर्षापासून मातीच्या पणत्या बाजारात कमी प्रमाणात दिसून येतात.यामागील कारण जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता मिळत नसलेली माती व यापेक्षा टेराकोटाच्या आकर्षक दिसत असलेल्या पणत्यांमुळे ग्राहक मातीच्या पणत्या घेताना दिसून येत नसल्याने मातीच्या पणत्या कमी प्रमाणात असल्याचे कुंभार व्यावसायिक बाबू सायन्ना पाशावार यांनी सांगितले.

◆मातीच्या पणत्या नामशेष टेराकोटाच्या पणत्या आकर्षक व बाजारपेठेत मातीच्या पणत्यापेक्षा मोठी मागणी आहे. त्यामुळे मातीच्या पणत्या नामशेष झाले आहेत.तसेच पुर्वीसारखा चालणारा कुंभार व्यवसाय दरवर्षी डबघाईला जात असुन कुंभार व्यवसायावर मोठे संकट उभारले आहे. यातच कोरोनाच्या संकटकाळात तर कुंभार व्यवसायाला मोठी आर्थिक झळ बसली आहे. त्यामुळे शासनाने कुंभार समाजाला उभारणीसाठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कुंभार समाजाकडून होत आहे.