चुडाणे येथे दारूबंदी जनजागृति कार्यक्रम व किराणा वाटप कार्यक्रम संपन्न

52

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.16नोव्हेंबर): दि.15 नोव्हेंबर रोजी शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे या आदीवासी गावात वीरांगना झलकाबाई कोळी स्री शक्ति सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी भाऊ बीज च्या पुर्वसंध्येला मोफत किराणा च्या वस्तु वाटप कार्यक्रम व दारूबंदी जनजागृति आयोजित करण्यात आला.संपुर्ण आदीवासी टोकरे कोळी लोकांची संख्या असलेल्या अतिशय मागासलेल्या या गावात दारू पिणा-यांची संख्या खुप मोठी आहे.

या कार्यक्रम च्या निमित्ताने महाराष्ट्र दारू बंदी महिला/ युवा मोर्चा व झलकारी बाई संस्थेच्या च्या अध्यक्षा सौ.गीतांजली कोळी यांनी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जंयती निमित्त अभीवादन करून , कष्टकरी आदीवासी लोकांना गावात दांरूबदी करण्यासाठी तळमळीने आवाहन केले.

या कार्यक्रम साठी उपस्थित अध्यक्ष स्थानी असलेल्या ले.Dr श्री जितेंद्र देसले,यांनी देखिल दारू च्या दुष्परिणाम यांची माहीती देऊन तरूणांना गाव दारू मुक्त करण्याचे आवाहन केले.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थितकोकण विद्यापीठ येथिल प्रा.उमेश बागल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दारूबंदी जनजागृति कार्यक्रमानंतर उपस्थित सुमारे शंभर आदीवासी महीलांना दानशूर व्यक्ति Dr आराधना राहुल भामरे, पो.नि.श्री.रत्नपारखी साहेब, पो.नि.श्री.गोराडे साहेब, सह पो.नि.श्री वळवी साहेब, पो.बिपीन पाटील, श्री.प्रवीण देवरे, श्रीमती आशा ताई रंध्रे, श्री जितेंद्र देसले, श्री उमेश बागल यांच्या वतीने तेल, साखर, चहा, साबण,मीठ,मुरमूरे, बिस्किट पुडे वाटप करण्यात आले.याबद्दल गावाचे पो.पाटील , ग्रामपंचायत सदस्य, युवकांनी आभार मानले.