प्रहारचे प्रा. सचीन ढवळे यांना विधानपरिषद पडविधर मतदार संघाचे निवडणुकीत विविध संघनांचा पाठींबा – रघुनाथ तोंडे

27

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114, 9404223100

गेवराई(दि.17नोव्हेंबर):- पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी मराठवाडा मतदान संघातून प्रहार जनशक्ती पक्षाकडून राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांनी प्रा.सचीन ढवळे यांना ऊमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी जाहीर होताच प्रा ढवळे यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना विविध शिक्षक राजकीय संघनानी पाठिंबा दर्शवलाआहे.

प्रा.ढवळे यांनी पदवीधरांच्या अनेक प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडण्याचे काम केले आहे विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न मांडुन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला तसेच विद्यार्थी हितासाठी वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवुन तसेच अनाथ आपंग निराधार यांच्यासाठी विविध योजना पुढाकार घेऊन राबविल्या याचीच पोचपावती म्हणून त्यांना आता उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे विविध संघटना तसेच अनेक राजकीय संघटना शिक्षक संघटना खाजगी कोचिंग क्लास आसोसिएशन आदिनी त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे अशी प्रहारचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी दिली.