सक्तीची वसुली न करता राज्यातील शेतकरी बांधवांचे सर्व वीजबिल माफ करा – अँड रवीप्रकाश देशमुख

61

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114 ,9404223100

गेवराई(दि.19नोव्हेंबर):-गेल्या सात ते आठ महिन्यापासून कोरोना मुळे लोकांच्या हाताला काम राहिलेले नाही,त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुस्कान झालेली आहे.आज शेतकऱ्यांचे एक वेळेचे जेवन मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हाताला कुठले काम नाही आणि शेतीतून कुठलेही उत्पन्न नाही अशी परिस्थिती असताना शासनाचे विज बिल भरायचे कसे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे.

शासनाने घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी असून तो रयत शेतकरी संघटनेला अमान्य आहे सरकारने घेतलेला सक्तीच्या वसुलीचा निर्णय मागे घ्यावा नसता राज्यभर आंदोलन करण्यात येईल.या वर्षात शेतकऱ्यांना लाईट दिलीच नाही आता लाईटची गरज आहे.

आता महावितरण सक्तीची वसुली करणार यात सरकारला थोडी शरम वाटायला हवी शासनाने वीज बिल भरण्याची सक्ती केलेली आहे त्याचा रयत शेतकरी संघटनेच्या वतीनेअँड.रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख(अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रयत शेतकरी संघटना) यांनी निषेध नोंदवला आहे.