किडीमुळे धानपिकाची नासाडी व रोगांचा प्रादुर्भाव

26

🔸पिकाचे पंकनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी – महेश गिरडकर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

तळोधी (बा)(दि.20नोव्हेंबर):-यावर्षीच्या सुरूवातिपासुन पावसाने दगा दिला .त्यांतच आता धान पिक निसवा अवस्थेत असताना पिकावर विविध किड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. हातात आलेला धानपिकाची पूर्णता तणस झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे पिकाचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी हरित सेना सदस्य महेश गिरङकर यांनी केलीआहे .नागभीड तालुक्यात बराच ठिकाणी सुरूवातिपासुन पावसाने दगा दिला .त्यांतच कसे- बसे शेतक-यानी धानाची रोवनी केली.

धानपीक जोमात व निसवा अवस्थेत असताना मावा, तुडतुङा रोगांनी धान पिकावर आक्रमण केले.हातात आलेला पीक वाचविण्यासाठी महागङया औषधाची फवारणी केली.माञ काही उपयोग झाला नाही. शेतातिल धानपीक रोगामळे व अवकाळी पावसाने पुर्णपणे नष्ट झाले.धान कापणी योग्य असताना मावा तुङतुङा रोगांमुळे धानपीक नष्ट झाले.

ऐन निसव्यावर असताना विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने हातात आलेले पीक पुर्णपणे नष्ट झाले.त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न शेतक-याना पङला आहे. धानाची उत्तरी अतिशय कमी होत असलयामुळे शेतक-याची दैयनिय झाली आहे . शासनाने त्वरित नुकसान भरपाई देवून दिलासा दयावा अशी मागणी गिरडकर यांनी केली आहे .