सत्ताधारी मानसिकताच तुम्हाला सत्तेत घेऊन जाईल

49

सत्तर वर्षे झाली आहेत सांसदीय लोकशाहीला…!!
सांसदीय लोकशाहीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाला सत्तेच्या खुर्चीत विराजमान करण्याचा आराखडा मांडला आहे…!!मुठभर सामंतशाही विचारांच्या आणि सवर्ण मानसिकतेच्या लोकांनी या सांसदिय लोकशाहीचा गळा घोटतं इथं घराणेशाही मजबुत केली, त्यासाठी प्रचंड जातीचे स्तोम माजवले आणि राजकारणात “जातीच्या” नांवाने बहूजन ओबीसी बांधवांची सत्ता हिसकावून घेतली हा सत्तर वर्षांचा अनुभव आहे…!!

महाराष्ट्रात विधानसभा आणि विधानपरिषदेत बहुतांश मराठा जातीचेच आमदार का निवडून जातात याचा अभ्यास केला तर सहजच लक्षात येते की, इथं विद्वेषी ब्राम्हणी आणि जातीय मानसिकतेच्या मोगलाई मराठ्यांची छुपी युती आहे आणि त्यांनी कधी जातीच्या तर कधी धर्माच्या नावाखाली समस्त ओबीसी बांधवांची मते लाटली आणि सत्ताधारी झाले…!!

मात्र संख्येने बहू असुनही ओबीसी सत्तेपासून वंचित राहिले आहेत…!!सत्तर वर्षांत कधीतरी,नाभिक, सुतार विधानपरिषदेचा उमेदवार बनवून आणि त्याला मते देऊन सत्ताधारी भाजप, शिवसेना, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आमदार केले आहे का..??ऊत्तर नाही असेच आहे आणि याचा सरळ अर्थ असा होतो की, छोट्या छोट्या ओबीसी जातींची सत्तर वर्षे सत्तेसाठी फसवणूक केल्या गेली आहे…!!आजही सत्ताधारी प्रस्थापित पक्षांकडे लोहार, सुतार कुंभार वा बेलदार,नाभिक अशा छोट्या जातीचा होतकरू आणि राजकीय मानसिकतेचा माणूस तिकिटासाठी आग्रह धरायला लागला तर ” तुमच्या जातीची मते किती आहेत”…??असा टोमणा मारुन उमेदवारी नाकारली जाते आणि त्यांच्या शेंबड्या पोरांना उमेदवार बनविल्या जाते हा अनेकांचा अनुभव आहे…!!

सत्तर वर्षे झाली आहेत आणखी किती दिवस या घराणेशाही वाल्यांचे जोडे ऊचलावे..??ओबीसी बांधवांनो आपली संख्या खुप मोठी आहे, आपल्या संख्येच्या बळावरच आपणं सत्तेत जाऊ शकतो मात्र त्यासाठी सत्ताधारी मानसिकता तयार करावी लागेल…!!नाभिकांची संख्या किती आहे.?हा प्रश्न आता गौण ठरवू,आमची ओबीसींची संख्या सत्तेत जाण्यासाठी पुरेशी आहे हा विचार आता पक्का डोक्यात घेऊ आणि पुढिल वाटचाल करु…!!सुतार, कुंभार, मेहतर ,लोहार, कैकाडी, वडार ,तेली, कोळी, गवळी, बेलदार ,मातंग, धनगर, हटकर,आम्ही सर्वच ओबीसी आहोत आणि ओबीसी आहोत म्हणून बांधव आहोत…!!आमच्या मधला ” बंधुभाव” आम्हाला सत्तेत घेऊन जाईल…!जर आम्ही बंधुभाव विकसित केला नाही तर आणखी शंभर वर्षे जरी लोकशाही राहिली तरीही आम्ही

सत्तेपासूनवंचितच राहू…!!
एकमेका साहाय्य करू…!!
अवघें धरु सुपंथ…!!

ओबीसी बांधवांनो महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत स्वातंत्र्या नंतर पहिल्यांदाच वंचित बहूजन आघाडीने संधी उपलब्ध करून दिली आहे, संधींचे सोनं करा….!!डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रुपाने तुम्हाला सत्तेचं दालन उघडले आहे, आणि वंचित बहूजन आघाडीच्या रुपाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा नातू बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला सत्ताधारी मार्गांवर आरुढ करीत आहे…!!

ऊठं बहूजना जागा हो…!!
वंचितांच्या सत्तेचा धागा हो…!!
बहूजन सारे एक होऊ…!!
सत्ता आपल्या हाती घेऊ…!!
जयभीम.

✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजणे सर
( राजकीय विश्लेषक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, विचारवंत,जेष्ठ मार्गदर्शक अकोला जिल्हा)
मो- 9960241375

▪️संकलन:-नवनाथ पौळ(केज तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185