मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक

31

🔸परळीतून सतिष चव्हाणांच्या विजयात मोठे योगदान देण्याचा महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्धार

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.20नोव्हेंबर):-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आ.सतिष चव्हाण यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुन त्यांच्या विजयासाठी परळीतून मोठे योगदान देण्याचा महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे प्रचार यंत्रणा व प्रचाराची जबाबदारी , प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून काम करण्याबाबत बैठकीत नियोजन करण्यात आले.

राष्ट्रवादी शहर कार्यालय सुभेदार व्यापारी संकुल मोंढा मार्केट येथे आज (गुरुवारी) बैठक आयोजित करण्यात आली होती.मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ व परळी शहरातील एकूण 7 बुथवरील बुथ समिती तसेच विविध जबाबदारी निश्चित करण्यात आल्या.

यावेळी प्रास्तविकपर मनोगतात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यां सोबत संवाद साधून मतदारांना गृहभेट तसेच प्रचार फेरींचे नियोजन,मतदान कसे करावे या बाबत संवाद साधला. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी मतदारसंघातून सर्वात जास्त मतदान देऊन विजय करणार असल्याचे बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले. परळी शहराच्या सर्व बुथचे या बैठकीत सुक्ष्म नियोजन या बैठकीत करण्यात येवून मतदानाची टक्केवारी 90% पेक्षाही जास्त करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी केला.

सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.विनोद जगतकर यांनी आमदार सतीश चव्हाण यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट मेंबर डॉ. पी. एल. कराड यांनी या निवडणुकीत प्रथम पसंतीच्या कोट्यातच आ. चव्हाण निवडून येणार असल्याचे सांगितले.

शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत असून प्रचंड शक्ती निर्माण झालेली आहे शिवसेनेसोबत आहे हा एक चांगला योग आहे असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख यांनी या निवडणुकीत अतिशय सूक्ष्म नियोजन करून एक-एक मतदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख यांनी सर्व मतदारांच्या भेटी घेऊन योग्य ते नियोजन करून आपल्याला परळी विधानसभा मतदारसंघातून आपण ताकदीनिशी प्रचार यंत्रणा उभी करून 95 टक्के मतदान होईल असे तयारी करण्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल ताटे यांनी तर आभार प्रदर्शन ऍड. मनजीत सुगरे यांनी केले.दरम्यान भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

या बैठकीस राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख,जिल्हा सरचटणीस बाळासाहेब देशमुख,राष्ट्रीवादी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे,शहरप्रमुख राजेश विभुते,प्रा.डॉ.विनोद जगतकर रविंद्र परदेशी, वैजनाथ सोळके, प्रा.डॉ.पी.एल. कराडसर नगरसेवक शरद मुंडे,अय्युबभाई पठाण किशोर पारधे, विजय भोयटे,अन्वर मिस्किन,शंकर आडेपवार शरीफ भाई,अनिल आष्टेकर,रमेश चौंडे,महादेव रोडे, जयराज देशमुख,राजेंद्र सोनी अजीझभाई कच्छी,वैजनाथ बागवाले,रमेश भोयटे,कुमार व्यवहारे,संजय देवकर,रवी मुळे,तक्की खान,बाशीत भाई,ताजखान पठाण,केशव गायकवाड,शोएब कुरेशी,यांच्यासह तालुका युवकाध्यक्ष सन्तोष शिंदे,शहराध्यक्ष सय्यद सिराज भाई,ऍड.मनजीत सुगरे,दत्ताभाऊ सावन्त,प्रा.शामसुंदर दासुद,अल्ताफ पठाण,नाझर हुसेन,के.डी.उपाडे ,अजय जोशी,अनंत ढोपरे,महेश तिडके,महेंद्र रोडे,जमिल अध्यक्ष,डी.जी.शिंदे सर,प्रा.डॉ.सुनिल चव्हाण सर,लक्ष्मण वाकडे,श्रीकांत माने,बळीराम नागरगोजे,अमोल कांबळे,सुरेश नानावटे, राजकुमार डाके,प्रकाश कदम,अमोल कानडे, बालाजी दहिफळे,कमलकिशोर सारडा,बालाजी वाघ,प्रितम जाधव, एस.जी.कांबळे,मजास इनामदार,सुरेश गित्ते,ओम काळे, पप्पु काळे,अमर रोडे,प्रताप समिनदरसावळे, धम्मा अवचारे,अनिल घेवारे,राजु घुले,भागवत कसबे,अभिजित तांदळे,प्रशांत देशमुख,संकेत दहिवडे,शाम कुकर,वैजनाथ जोशी,श्रीपाद चौधरी,हसन भाई,शरद कावरे,गणेश मगर, देवेंद्र कासार,मंगेश मगर,संजय गरजे,रंगनाथ सावजी, अमित केंद्रे,पवन फुटके, भागवत गित्ते,रमेश पवार, राम ढेंगळे मनोज कराड, मुख्तार सेठ,गणेश सुरवसे, उमेश सुरवसे,प्रदीप जाधवर, अतुल ताटे,मारुती चव्हाण, राहुल प्रकाश जगतकर, विविध सेल चे पदाधिकारी,माजी नगरसेवक व पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.