केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचा ‘वाढदिवस निमित्ताने झाडे लावा-झाडे वाचवा’ चा संकल्प

99

🔸19 नोव्हेंबर रोजी उपक्रमाचा श्रीगणेशा

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.20नोव्हेंबर):-हिंगणघाट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन ने पारित केलेल्या नवीन आदेशानुसार प्रत्येक सदस्य आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सामाजीक व नैसर्गिक दायित्व समजून एक झाड लावावे असे ठरविण्यात आले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना नितीन क्षीरसागर यानी मांडली व एकमताने पारित करण्यात आला.

दिनांक 19/11/2020 ला उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला.जेष्ठ सदस्य, माजी नगरसेवक, तेजस मेडिकल चे संचालक श्री. राजेंद्र खुपसरे याचे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास असोसिएशन चे सदस्य उपस्थित होते.

वर्धा जिल्हा केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष श्री. नवलजी मानधणिया, पर्यावरण संवर्धन सदस्य नितीन क्षीरसागर, हिंगणघाट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट चे उपाध्यक्ष प्रकाश वाघमारे, सचिव विनय मोरे, सुधीर सिंघवी, अक्षय मुखी, गणेश वैरागडे, धिरज मरोठी तसेच पर्यावरण प्रेमी व सदस्य उपस्थित होते