गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

28

🔺चिमूर येथील दुःखद घटना

✒️चिमूर(पुरोगामी संदेश डिजिटल नेटवर्क)

चिमूर(दि.20 नोव्हेंबर):-येथिल नाकाडे दुकान चाळ (चिमूर-वडाळा ) मध्ये कार्यरत श्री साई डिजिटल बॅनर अँड फोटो स्टुडिओ चे प्रो.प्रा. रोशन श्रीधर मोडक(वय 23 वर्षे) या युवकाने आपल्या दुकानात गळफास लावुन आत्महत्या केली.ही घटना आज दुपारी 4 वाजताची असल्याचे बोलल्या जात आहे.

आज येथील शुक्रवार आठवडी बाजार असल्याने घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे कारण बातमी लिहिपर्यंत समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.मोहोड करीत आहेत.