चिमूर मध्ये अनियमित पाणीपुरवठा ,नप प्रशासन चे दुर्लक्ष

31

🔺दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा शफिक उर्फ पप्पु शेख यांनी दिला इशारा

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.21नोव्हेंबर):- नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या विविध प्रभागात नियमित येत असलेला पाणी पुरवठा अनियमित येत असल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे परंतु नगर प्रशासन केवळ हे दुर्लक्ष करीत आहे येत्या दोन दिवसात नप ने पाणी पुरवठा सुरू न केल्यास नप समोर आंदोलनाचा इशारा युवक कांग्रेस चे पदाधिकारी शफीक उर्फ पप्पू शेख यांनी दिला आहे.

चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या टिळक वार्ड प्रभाग क्र ८, गुरुदेव वार्ड प्रभाग क्र१४ ,आझाद वार्ड प्रभाग क्र,१२ तसेच इतर वार्डात नगर परिषद चा पिण्याचा पाणी पुरवठा बंद आहे त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे दूषित पाणी सुद्धा येत आहे तेव्हा नगर परिषद प्रशासन मात्र डोळेझाक करीत असून याकडे दूर्लक्ष करीत आहे.

नगर परिषद ने दोन दिवसात म्हणजे दि २३ नोव्हेंबर ला पाणी पुरवठा सुरू न केल्यास नप समोर आंदोलन करण्याचा इशारा युवक कांग्रेस चे शफीक उर्फ पप्पु शेख यांनी दिला आहे.