आसोली येथे अन्नकूट गोवर्धन पूजा कार्यक्रम संपन्न

32

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.22नोव्हेंबर )- तालुक्यातील आसोली येथील गोशाळेत रविवारी पाडव्यानिमित्त अन्नकूट गोवर्धन पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.सायंकाळी चार वाजता शेनापासून पासून बनवलेल्या गोवर्धन पर्वताची विधिवत पूजा यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष क्रांती उर्फ बाळासाहेब पाटील कामारकर .जि.प.सदस्य अँङ अमय नाईक. गिरीश अग्रवाल. दयाराम चव्हाण. मदन जांगिड. भगीरथ जांगिड .भारत पाटील, यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी गाई चारणारे अजाबराव पारध.राजू चव्हाण. बाळू गायकवाड. दत्ता गायकवाड. पप्पू देव्हारे. सखाराम काष्टे .यांना पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाया कार्यक्रमाचे आयोजन गोपाल कृष्ण गोरक्षण संस्था आसोली यांच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुरेंद्रसिंग राठोड .तायवाडे साहेब .नंदूजी काळे .राधेशाम जांगिड .दीपक परिहार. डॉक्टर रूपाली जयस्वाल .अनिता पाटील. रश्मी पानपट्टे.सीतादेवी जांगिड, दत्ता बर्डे. अशिष भास्कर ,विलास महाजन, श्याम ज्ञानचंदानी ,अशोक आगवाणी,रूपेश उत्तरवार, गणेश अग्रवाल,नितीन पांडे,कैलास चौधरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंगसाजी महाराज भजनी मंडळ आसोली व बाळू महाराज सेलुकर यांचे कीर्तन झाले. यावेळी डॉक्टर पंकज जयस्वाल. यांनी आपल्या भाषणातून गोमातेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशासाठी गो शाळेचे अध्यक्ष शंकर पांडे, सचिव गजानन पाथरकर. संचालक अनिल पांडे व गावकरी यांनी परिश्रम घेतले.