नगरसेवकाकडे गँस सिलेंडरची वीस लाखाची धाडसी चोरी, दोडांईचा पोलीसांना पुन्हा आव्हान

30

🔹वाँचमन सुट्टीवर असल्याचे साधत, पाचशेच्या आत दोन ट्रक भरतील ऐवढे सिलेंडर चोरी

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोडांईचा(दि.22नोव्हेंबर):- येथील धुळे रोडवर अंहिसा पाँलीटेक्नीकल काँलेज समोर असलेल्या *इशरियाज* इंडेन गँस एजन्सीच्या गोडाऊनवर अज्ञात चोरांनी दिनांक २२ नोव्हेबंरच्या रात्री-एक ते चार वाजेच्या पहाटे धाडसी चोरीच्या घटनेला लक्ष करत घरगुती वापरायचे भरलेले ४९७/ गँस सिलेंडर(२५००+७००)ऐकुण ३२००/रुपये प्रती नग, मोठे व्यवसायिक ४०/ गँस सिलेडंर(२५००+१३००) ऐकुण ३८००/प्रती नग,रेग्युँलेटर ३८०/नग(३५०/रुपये प्रती नग) व नवीन गँस शेगडी २२/नग(२०००/रूपये प्रती नग) असा एकूण दोन ट्रक भरतील ऐवढा वीस लाखाचा आतील माल धाडसी चोरी करत. स्थानिक पोलीसांना, गावात आताची परिस्थिती पाहत, तपास लावायचे एक प्रकारे आव्हानच दिले असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. याबाबत दोडांईचा पोलिस स्टेशनला उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दोडांईचा नगरपालीकेत नगरसेवक असलेले सुफीयान अहमद रियाज तडवी यांचे स्टेशन भागातील रोटरी हाँस्पीटलजवळ सर्वोदय काँलनीमध्ये घर व *इशरियाज* गँस एजन्सीचे शेजारीच आँफीस आहे.तसेच धुळे रोडवरील अहिंसा पाँलीटेक्नीकल काँलेजसमोर गँस एजन्सीचे मोठे गोडाऊन आहे. ह्या गोडाऊनवर नेहमी वाँचमन असतो. मात्र मागील तीन दिवसापासून वाँचमन आजारी असल्याचे संधी साधत अज्ञात चोरांनी दिनांक २२ नोव्हेबंरच्या रात्री-पहाटेच्या सुमारास दोन ट्रक भरतील अशा वीस लाखाच्या आतील गँस सिलेंडर धाडसी चोरीच्या घटनेला अंजाम दिला आहे. याबाबत नगरसेवक सुफीयान तडवी,व शिबान तडवी यांना सकाळी ९.०० वाजता घटना लक्षात आली. यावेळी त्यांनी लगेच आपले नगरसेवक मित्र सोबत घेत, स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली.

यावेळी घटनास्थळी तातडीने प्रोबेशनरी *एसपी.श्री पंकज कुमावत,* सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष लोले, हवलदार श्री उमेश चव्हाण, पोलीस नाईक श्री मुकेश आहिरे, श्री राजेंद्र सोनवणे, भाजपा शहराध्यक्ष श्री प्रवीण महाजन, बांधकाम सभापती श्री निखील राजपुत, आरोग्य सभापती पती श्री जितेंद्र गिरासे ,श्री कुष्णा नगराळे,पत्रकार आदी उपस्थित होते.तसेच दुपारी उशिरापर्यंत दोडांईचा पोलीस स्टेशनला शिबान अहमद रियाज तडवी यांनी फिर्याद देत ,दाखल करायचे काम सुरू होते.

गावात मागील दोन महिन्यांपासून नगरसेवक यांच्या मीलमधील ९६ कट्टयांची तांदूळ चोरीसारखी मोठी घटना. तसेच मोटरसायकल चोरी व लहान मोठ्या इतर वस्तूंच्या चोरीच्या घटनांना चोरांकडून लक्ष केले जात असल्या कारणांने जनता मालमत्ता सुरक्षिततेबाबत भयभीत झाली आहे. दोडांईचा शहरातील ठराविक भागातील मंडळी ह्या चोरींच्या घटनांना लक्ष करते व बर्ऱ्याच वेळा फिर्यादी तक्रार न देता .आपलाच माल ह्या ऐरियात जावून अर्ध्या किमंतीत घेतो, हे सर्वज्ञात आहे.म्हणून पोलिसांनी चोरींच्या घटनांना मुळासकट जावून , चोर व मुद्देमाल हस्तगत करत, नागरिकांमध्ये खात्याची विश्वासार्हता जागवली पाहिजे. तरच जनता मोकळेपणाने श्वास घेऊन, पोलीसांवरचा विश्वास टिकून राहील, अशी रास्त अपेक्षा गावातील सर्वसामान्य नागरिक करत आहे.