कुंडलवाडी ग्रामिण रुग्णालयाचे निधी परत जाण्‍याच्‍या मार्गावर

104

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.23नोव्हेंबर):- येथील नव्‍याने मंजूर झालेल्‍या ग्रामीण रुग्णालयाच्‍या जागेच्‍या वादावरुन भूमी पुजनाचे काम थांबल्‍याने जागेचा वाद तिडा निघाला नाही तर हा निधी परत जाण्‍याच्‍या मार्गावर असल्‍याने शहर व परिसरातील नागरिक व सर्व पक्षीय लोक प्रतिधिीनी पक्षभेद विसरुन एकत्र येवून जागेचा वाद मिटवून तात्‍काळ हे प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.

प्राथमीक आरोग्‍य केंद्राजवळील बंद पडलेली जिल्‍हा परिषद शाळेच्‍या ठिकाणी शासनाने आरोग्‍य विभागाने जिल्‍हा परिषेदेडुन भूसंपादन करुन गुतेदारांनी कामाला सुरुवात केली होती परंतू काही लोकांनी या कामा संदर्भात तक्रार करुन काम थांबवल्‍याने जिल्‍हाधिका-यांनी बिलोली तहसिलदाराकडून नव्‍याने बांधकाम करित असलेल्‍या त्‍या जागेची माहिती मागवली होती बिल्‍ड वर्ल्‍ड कंस्‍ट्रक्‍शन कंपनीचे गुतेदार महमंद नजीर अहेमद यांना सदर इमारतीचे बांधकाम का थांबले असे विचारणा केली असता काम थांबले असल्‍याचे सांगितले.

कुंडलवाडी येथे ग्रामिण रुग्णालय व्‍हावे अशी मागणी गेल्‍या पंचवीस वर्षा पासुन मागणी होती परंतू माजी आमदार सुभाष साबने यांनी भाजप सेनेची सता असताना त्‍यांनी आरोग्‍य मंत्री दिपक सावंत यांच्‍याकडे वारंवार पाठपुरावा करुन कुंडलवाडी येथे ग्रामिण रुग्णालय मंजुर करुन घेवुन या रुग्‍णालयाचे कार्यरंभ आदेश नांदेड येथील बिल्‍डवर्ल्‍ड कंस्‍ट्रक्‍शन कंपनीला काम ही देण्‍यात आले होते. आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत महत्‍वाचे व शहर व परिसरातील तीस गांवाच्‍या लोकांना याचा लाभ होणार आहे.

यासाठी नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार,मा.नगराध्यक्ष डॉ.एस.एस.शेंगुलवार,सुनील बेजगमवार,नगरसेवक मुखतार खाजामिया शेख,शैलेश -याकावार,सुरेश कोंडावार,शंकर गोनेलवार,सचिन कोटलावार,नगरसेविका शकुंतलाबाई खेळगे,सौ.पडकुटलावार बाई.नंदाबाई कांबळे, शहराध्‍यक्ष प्रदिप अंबेकर ,राजू पोतनकर, सिराज पटेदार, यांनी पुढाकर घेउन या कामासाठी राजाचे बांधकाम मंत्री व पालकमंत्री अशोकरराव चव्‍हाण व आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना भेटून हे काम तात्‍काळ मार्गी लावावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.