महात्मा फुले समता परीषदेचा ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

35

🔹महिला,विद्यार्थी विद्यार्थीनी युवक यांचा सहभाग

🔸मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

✒️सचिन महाजन(प्रतिनिधी हिंगणघाट)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.25नोव्हेंबर):-महाराष्ट्रात ओबीसींचा मंडल आयोग १९९४ साली लागु होवुनही, पंचविस वर्षानंतरही ओबीसींच्या समस्या कायमच नाही,तर त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे! ओबीसी विद्यार्थ्यांची तीन हजार कोटीची थकित शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांची वसतीगृहे, स्वाधार योजना,महाज्योतीला हजारो कोटीचा निधी हे विषय ऐरणीवर असतांना, आता काही लोकांनी ओबीसींचे आरक्षणच धोक्यात आणण्याचे कट कारस्थान सुरू केले आहे! त्यासाठी महाराष्ट्रात ओबीसी जनजागृती करून, तसेच सरकारला ईशारा देण्यासाठी महाराष्ट्रभर महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव चे मोर्चे निघत आहे!

त्याचा भाग म्हणुन वर्धा येथे महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर समता परीषदेचे विभागीय अध्यक्ष , प्रा. दिवाकर गमे व राष्ट्रवादी ओबीसी सेल चे प्रदेशाध्यक्ष ईश्र्वर बाळबुधे यांच्या नेतृत्वात ओबीसींचा मोर्चा काढण्यात आला!यामध्ये महिला, विद्यार्थी विद्याद्यार्थीनी युवक व ओबीसी मधील विविध जात बांधवाचा सहभाग होता!मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण मिळावे याचा ओबीसीं सह सर्वांचा पाठींबा आहे! परंतु आता काही ओबीसी नेते मराठा समाजाला ओबीसींमधुन आरक्षण द्यावे, म्हणुन सरकारवर दबाव आणत आहे!

तर काही मराठा नेत्यांनी मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून, ओबीसींमधील कुनबी तेली माळी धनगर सह सर्व ४०० जाती ह्या कुठलीही पडताळणी न करता बोगस रित्या टाकल्या म्हणुन त्यांना ओबीसीतुन काढुन टाकावे,व मराठा समाजाला ओबीसी म्हणुन आरक्षण द्यावे अशा याचिका दाखल केल्या आहेत!दुर्दैवाने शासन आणि ओबीसींचे दुर्लक्ष झाल्यामुळे ही याचिका स्विकारली आहे! काही दिवसात या सर्व ४०० ओबीसी मधील जातींना ओबीसींचे आरक्षण घेण्यास अंतरिम स्थगिती द्यावी,या मराठा नेत्यांचाया मागणीवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे! आणि अशी स्थगिती न्यायालयाने दिली,तर ओबीसी समाजावर, विद्यार्थ्यांवर युवकांवर फार मोठा आघात होवुन अन्याय्य होईल!शिक्षण नोकरी आणि स्थिनिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीचे आरक्षण रद्द होईल!

याची जनजागृती करण्यासाठी व न्यायालयात राज्य सरकारने चांगले वकील देवुन, ओबीसींचे आरक्षण कायम राखण्यासाठी, तसेच मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करू नये ,यासाठी सरकारला ईशारा देण्यासाठी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते!हा मोर्चा बजाज चौक वर्धा येथुन निघुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ थांबविण्यात आला!तेथे सभा घेण्यात आली. त्यानंतर निवडक पाच व्यक्तीचे शिष्ठमंडळ मा. जिल्हाधिकारी यांना भेटुन, मा. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले!

या ओबीसी आरक्षण बचाव मोर्च्यात महात्मा फुले समता परीषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्र्वर बाळबुधे,प्रा. जगदीश जुनगरी,समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष निळकंठ पिसे, विनय डहाके, विशाल हजारे, निळकंठराव राऊत,भरत चौधरी,पुंडलिक नागतोडे, जयंत भालेराव,रवि जोगे,महिला अध्यक्ष कविता मुंगले, किरणताई कडु, रेखा खेलकर,अल्का बागुल,वनिता धामंदे,कवडुजी बुरंगे,वनिता झाडे,हरीश काळे,शारदा खडसे, श्रध्दा कडु,राजश्री काळे,विमल एकरपुरे,मिलिंद पाचपोर, सुरेश बोरकर,किशोर तितरे, हेमराज हरणे,जयंत मानकर,श्याम जगताप,संजय म्हस्के,प्रभाकर धोटे,राहुल जाधव,अर्चना मुडे,शारदा ढोक,वृषाली कदम,ईश्र्वर पवार,महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थीनी, महिला,व युवक मोठ्या संखेने उपस्थित होते!