आठवले समाजकार्य महाविद्यालयात संविधान दिन

25

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.26नोव्हेंबर):-आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे ग्रंथालय विभागातर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनिल झाडे सर विशेष अतिथी म्हणून महाविद्यालयाचे अधिक्षक श्री सुभाष शेष कर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रा ग्रंथपाल डॉ सुरेश हुमने उपस्थित होते उद्देशिकाचे वाचन प्रा. डॉ. रागिणी भैसारे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना सिंगण जूडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसठी श्री अमरसिंह डेकोले, श्री विलास इंगोले यांचे सहकार्य लाभले . कार्यक्रमा करिता डॉ. कसारे सर, डॉ मिलमिले सर, डॉ. खापर्डे सर,डॉ. कुमरे सर,प्रा. वीणा काकडे,प्रा. शिल्पा गणवीर,डॉ. बनसोड सर, श्री अनिल मेश्राम, श्री पेदुल वार , श्री गावंडे, श्री पद्माकर डुकरे , श्री रामा गायकवाड , श्री सुधीर मसराम, श्री दिपक गोपाले विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.