भाजपा दोंडाईचातर्फे संविधान दिन साजरा

31

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.26नोव्हेंबर):-दोंडाईचा शहर भाजपातर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन, उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये, भाजपा सरचिटणीस कृष्णा नगराळे , जितेंद्र गिरासे ,भरतरी ठाकुर,माजी नगरसेवक रामभाऊ माणीक , प्रफुल्ल साळुंके , केदारनाथ कवडीवाले इ मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमास सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच भाजपा अनुसुचित जातीचे अध्यक्ष रवि अहिरे यांनी संविधान वाचुन इतरांनी त्यांच्यामागे म्हणुन अभिवादन केले.

भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की डॉ बाबासाहेब यांनी संविधानाचा मसुदा तयार करतांना जगातील सर्व लोकशाही देशांचा संविधानाचा अभ्यास करुन भारताचे संविधान लिहिले त्यासाठी त्यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस अहोरात्र स्वअक्षरात लिहुन पुर्ण केले.१५ नोव्हेंबर १९४९ सुपूर्द करुन २६ नोव्हेंबर १९४९ला भारतीय संसदेने स्विकारले व त्याची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासुन झाली तसेच आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी २६ नोव्हेंबर २०१५ पासुन संपुर्ण देशभरात संविधान दिवस साजरा करण्याचे घोषीत केले.

डॉ बाबासाहेब यांनी संविधानात न्याय व्यवस्था , प्रशासन व कायदेमंडळाच्या माध्यमातून भारत देशाची लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही निर्माण होईल असे संविधान लिहिले त्यात देशाची अखंडता , सार्वभौमत्व,समता , एकात्मता इ गोष्टींचा समावेश करुन देशप्रेमाची भावना रुजवुन लिंगभेद ,जातीभेद , नष्ट करुन सर्वसामान्य नागरीकांना मुलभुत अधिकार इ उद्दीष्टे समोर ठेऊन लिहलीत . उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये यांनी आपल्या देशाची लोकशाही हि मजबुत लोकशाही असुन आपण सर्व देशवासीयांना वरदान आहे .कवडीवाले ,मक्कन माणीक ,कृष्णा नगराळे इ मान्यवरांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमास भाजपा शहर अध्यक्ष तथा पाणी पुरवठा सभापती, प्रविण महाजन, उपनगराध्यक्ष रवींद्र उपाध्ये, भाजपा सरचिटणीस नगरसेवक कृष्णा नगराळे, आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे, भाजपा सरचिटणीस, नगरसेवक भरतरी ठाकुर, माजी नगरसेवक रामभाऊ माणिक, रवींद्र महाले, सचिन नगराळे, भाजपा दलित आघाडी प्रमुख रविंद्र अहिरे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख मनोहर कापुरे, प्रवीण आगळे, मक्कन माणिक,गोविंदा नगराळे, व्यापारी असोसिएशनचे राहुल कवाड, कवडीवाले सर, प्रफुल्ल साळुंखे, भुपेंद्र मोहिते, अजय बिरारे, सागर नगराळे, मुकेश नगराळे, दादाभाई कापुरे, धीरज कापुरे, आनंद माणिक, मिलिंद नगराळे, शिवा नगराळे, दिलीप नगराळे, योगेश लांडगे, पप्पू तिरमले, टायगर धनगर, धनराज करणकाळ, सिद्धार्थ रामराजे, प्रफुल्ल नगराळे।इ मान्यवर उपस्थित होते.