चातुर्वर्ण्याच्या दृष्कलंकित षडयंत्राचे चिकित्सक विश्लेषण – शूद्र पूर्वी कोण होते ?

36

✒️लेखक:-संदिप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००

डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक महत्वपुर्ण ग्रंथ लिहून भारतीय समाजाला नवी विचारसरणी , नवी दिशा दिली आहे.ते इतिहासा सबंधी म्हणतात की,”जो व्यक्ती आपला इतिहास समजून घेतली नाही,तो व्यक्ती आपला इतिहास घडवू शकत नाही.”इतिहासातील तथ्य बाबींचा सांगोपांग अभ्यास करून पूर्वग्रहदूषितपणा त्यागून इतिहासाची तंतोतंत छाननी केली पाहिजे.परंतु ब्राम्हणी इतिहासकारांनी बहुजनाचा इतिहास हा विकृत लिहून स्वतःच्या इतिहासाचे गोडवे गायले आहेत.त्यामुळे बहुजनाचा खरा इतिहास समोर आला नाही.इतिहासकाराचे महत्व अधोरेखित करताना डाँ .बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,”इतिहासकार हा काटेकोर,तळमळीचा आणि पंक्तीप्रपंच न करणारा असली पाहिजे;तो भावनाविरहित आपुलकीची भावना ,भीती,तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ यांच्यापासून मुक्त असा असला पहिजे; आणि इतिहासाची जननी जी सत्यनिष्ठा ती त्याच्या रोमारोमांत भिनलेली असली पाहिजे.

महत्कृत्यांना सुक्तात ठेवणारा ,अंधाराचा संहार करणार ,पूर्वी -काळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असा तो असला पाहिजे,थोडक्यात सांगायचे म्हणजे रिकामे नसणारे नव्हे ,पण उघडे असणारे असे त्याच्या मन पाहिजे आणि खोटेनाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुरावे याचा छाननी करण्याची त्याची तयारी पाहिजे.”तरच ते संशोधन सत्यनिष्ठेवर झाले असे म्हणता येईल.

ब्राम्हणानी जे ग्रंथाच्या लिहिले आहेत ही शुध्द फसवणूक आहे.स्वतःचे हित बाकी सर्व समाजाचे अहित असलेले वाड्:मय म्हणजे कपोलकलपित कथाचा व कादंबरीमय वर्णनांचा एक संग्रह आहे आणि असला संग्रह अभ्यासाच्या योग्यतेचा नसून तो उकिरड्यावर फेकून देण्याच्या लायकिचा आहे.असा गर्भित इशारा आपल्या शूद्र पूर्वी कोण होते? या ग्रंथाच्या प्रास्तविकात दिलेला आहे.

शूद्र पूर्वी कोण होते?हा ग्रंथ १९४६ मध्ये प्रकाशित करण्यात आला.हा ग्रंथ महात्मा जोतीराव फुले यांना अपर्ण केला आहे.या ग्रंथात एकूण १२ प्रकरणे असून शूद्राच्या उत्पतीवर व त्यांच्या समाज व्यवस्थेवर संशोधनपर विश्लेषण करण्यात आले आहे. या ग्रंथाचा हेतू विशद करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,”शूद्रांना आपण सध्याच्या अवनत अवस्थेला येऊन कसे पोहचलो याची ज्यांना माहीती नाही ,अशा अज्ञानी आणि बिनमाहितगार शूद्रांच्या उपयोगासाठी मी हे पुस्तक लिहीलेले आहे.”यावरुन या पुस्तकाचे महत्व शूद्रांनी समजून घेतले पाहिजे. आधुनिक काळातही अनेक बहुजन वर्ग या ग्रंथाचे मोल जानून न घेता , ब्राम्हणाच्या षडयंत्राचे गुलाम झालेले दिसतात.
आपल्या संशोधनात हिंदी -आर्य समाजात चवथा वर्ण कसा निर्माण झाला यांची मिमांसा करताना ते म्हणतात की,”१) सूर्य वंशाच्या ज्या आर्य जमाती होत्या त्यातील एका जमातीचे शुद्र होते.२)एक काळ असा होता की ,ज्यावेळी आर्य समाज फक्त तीन वर्ण म्हणजे ब्राम्हण,क्षत्रिय, वैश असे वर्ण मानित होता.३) शूद्रांचा स्वतंत्र असा वर्ण नव्हता,हिंदी-आर्य समाजातील क्षत्रिय वर्णाचा एक भाग असा शूद्रांचा वर्ण होता.४) शूद्र राजे आणि ब्राम्हण यांच्यामध्ये एकसारखी झगडे चालू असत या झगड्यामूळे ब्राम्हणांवर अनेक अत्याचार आणि अपमानास्पद दुराचार करण्यात आले होते.५) शूद्रांनी आपल्यावर अत्याचार व जुलूम केले ही जाणीव ब्राम्हणांच्या अंतःकरणाला एकसारखी टोचण्या देत होती म्हणून ब्राम्हण शूद्रांचा द्वेष करू लागले व द्वेषामुळे शूद्रांचे उपनयन करण्याचे ब्राम्हणांनी नाकारले.६) शूद्रांना उपनयन नाकारल्यामुळे शूद्र आपल्या मुळच्या क्षत्रियपदापासून च्युत झाले व सामाजिक दृष्टीने त्याची अधोगती झाली.त्यामुळे त्यांचा दर्जा वैश्यांच्या खालचा झाला आणि याप्रमाणे त्यांचा स्वतंत्र चवथा वर्ण उत्पन करण्यात आला.” असे संशोधनपर निष्कर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले आहेत.

शूद्रांचा कूटप्रश्न या प्रकरणात चातुर्वर्ण्य उत्पतीचे मुळ कशात आहे यावर संशोधन केले आहे.ऋग्वेद,पुरूषसुक्त,एेतरेय ब्राम्हण,विष्णूू पुराण,मत्स पुराण ,रामायन अशा अनेक ग्रंथाताचा अभ्यास करून विश्वउत्पतीसंबंधीचे दाखले दिले असून हे सर्व अवैज्ञानिकावर आधारीत असून अनेक ग्रंथामध्ये ब्राम्हणांनी स्वत़ःच्या कल्पनेचे भारूड रचले आहे.त्याच्या लिहण्याला कुठलाच सैध्दांतीक आधार नाही.विश्वउत्पतीसंबंधीस दोन सिध्दांत असून पहिला निर्जीवातून सजीवांची उत्पतीचे झाली,तर दुसरा विश्वोत्पत्ती पुरूषापासून झाली.हे दोन्ही सिध्दांत ऋग्वेदात परस्परभिन्न आहेत.अध्याय २ सुत्र १-४, मध्ये ब्राम्हण त्यांचे मुख होता क्षत्रिय त्यांचे बाहू होता वैश्य त्यांच्या मांड्या शूद्र त्याच्या पायापासून उत्पन्न झाले.अशी अर्तार्तिक मांडणी केलेली दिसते.तर मनुस्मृती अध्याय १ ,श्लोक ३१-मध्ये सांगितले आहे की,”तिन्ही लोकांच्या सुखासाठी. परमेश्वराने आपल्या मुखापासून,बाहूपासून,माड्यापासून,आणि पायापासून ब्राम्हण,क्षत्रिय,वैश्य,व शूद्र हे उत्पन्न केले.

ही रचना समाजाच्या शोषणाची प्रतिक बनली . धर्माच्या नावाखाली अनैतिक व्यवस्था निर्माण करुन शूद्राला मानवीय जीवनापासून परावृत्त करण्यात आले.त्याची सर्व शक्ती बनावट ग्रंथानी समाप्त करुन टाकली.त्यासाठी शूद्रांनी कूटप्रश्ननाची जाणीव समजून घेणे गरजेचे आहे.

शूद्रांच्या उत्पतीबद्दल ब्राम्हणग्रंथामधील सिध्दांत कसे आहेत या प्रकरणात चर्चा करताना त्यातील तथ्ये तपासले आहेत.यजुर्वेेद;या मध्ये शुक्ल व कृष्ण असे दोन भाग आहेत.यात पुरुष सुक्तात मांडलेल्या सिध्दांत बरोबर सहा श्लोकाची भर वाजसनेयी संहितेत घातली आहे.तैतरीय संहिता,तैतरीय ब्राम्हण ,अर्थववेद यामध्ये शूद्रांच्या उत्पतीबद्दल अनेक काल्पनिक माहीती दिली आहे ती पूर्ण पणे चुकिची आहे. तैतरीय ब्राम्हण मध्ये,”शूद्र याला यज्ञाचे अधिकार दिलेले नाहीत त्याचप्रमाणे घोडा व शूद्र यांची उत्पत्ती पायापासून झालेली असल्याने ती स्वतःच्या पायाच्या श्रमावर जगतात अशी मांडणी केली आहे.ब्राम्हण ग्रंथाची मीमांसा करताना प्रो.मँक्समुल्लर म्हणतो की,”हिंदी मनोवृत्तीच्या ज्या काही घटना आहेत त्यातील एक अत्यंत मनोरंजन घटना ब्राम्हण ग्रंथावरून दिग्दर्शित केली जाते.यात शंका नाही परंतु वाड्ःमयाच्या कसाला जर हे ग्रंथ लावले तर त्या कसाला ते उतरत नाही.

हे सत्यवचन सांगितलेले आहे.चार वर्ण व आणि शूद्र यांची उत्पत्ती कशी झाली .हे ब्राम्हण ग्रंथात केलेली मांडणी व सर्व अनुमान म्हणजे शतमुर्खाची बडबड किंवा माथेफिरूची आरडाओरड होय.इतिहासाच्या विद्यार्थांला तर त्याचा कवडीमात्रही उपयोग होणार नाही.कारण त्यांना एेतिहासिक पुरावा या दृष्टीने काहीच तथ्य नाही.

शूद्रांचा दर्जा कोणता,याबद्दलचे ब्राम्हण ग्रंथातील प्रमेय या प्रकरणात विवेचन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिहतात की,”कथक संहिता,शतपथ ब्राम्हण,एेतरेय ब्राम्हण, आपस्तंब धर्मसुत्र ,वसिष्ठ धर्मसुत्र,मनुस्मृती,विष्णूस्मृती,गौतम धर्मसुत्र,नारद स्मृती इत्यादी ग्रंथानी शूद्राच्या जीवनासाठी कठोर कायदे तयार करून स्वतःच्या हिताला प्राधान्य दिले आहे.यावरून त्यांचा कावेबाजपणा दिसून येते.शूद्रांनी काय करावे, काय करू नये,काय खावे,काय खाऊ नये अशा अनेक षडयंत्रकारी कायद्यामधून शूद्रांच्या जीवन पशूतुल्य करून टाकले होते.त्यांचे नैसर्गिक हक्क नाकारले होते. ब्राम्हणांनी शूद्राचे कायद्यात लिहिले आहे की,”१) सामाजिक रचनेत शूद्रांचा दर्जा शेवटचा ठरविण्यात आला.

२) शूद्रांनी ज्ञान संपादन करू नये ,त्याला शिक्षण देणे हे पाप आह.३) शूद्र गुलामगिरीत जन्म तो त्याला गुलामगिरीतच ठेवले पाहिजे. यावरुन असे लक्ष्यात येते की,ब्राम्हणाची नैतिक भावना पूर्णपणे नष्ट झालेली आहे.ही मनोवृत्ती किती दांभिक आहे हे समजून येते.आर्य ग्रंथासोबतच रोमन कायद्याचे विवेचन केले आहे.या कायद्यात जन्मल्यानंतर हक्क मिळत होते पण आपल्याला मिळत नव्हते.रोमन कायद्याने निर्माण केलेले निर्बंद कायम स्वरूपाचे नव्हते.तर आपल्याकडील कायदे पिढ्यांपिढ्यां जसेच्या तसे चालत होते.म्हणून त्यांना समाज परिर्वतन करता येत नव्हते.शुद्रांना वेदाध्ययनाचा गुन्हा होता ,तो केला तर त्याची जीभ तोडावी आणि त्याने वेदमंत्राचे घोष एेकले त्याच्या कानात तापवून वितळलेल्या शिसाचा रस ओतावा . शूद्रांनी आपल्यावरील निर्बंद झूगारून देण्यास धडपडू नये म्हणून त्याला जबरदस्त दहशत घालविण्यासाठीच धर्मसुत्राची रानटी शिक्षा शूद्रांना सांगितली होते हे दिसून येते.

शूद्र आणि आर्य यांचा झगडा कसा होता, या प्रकरणात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हणी ग्रंथाचे योग्य मार्गदर्शन होऊ शकत नाही म्हणून युरोपियन ग्रंथकाराचा विचार केलेला दिसतो.युरोपियन ग्रंथकार मानतात शूद्रोत्पती ही एक सामाजिक बाब आहे,तर ब्राम्हणी ग्रंथकार मानतात ती एक परमेश्वरी इच्छेनुसार झालेली घटना आहे.यावरून युरोपिय ग्रंथकाराचा सिध्दांत समाधानी वाटतो . ब्राम्हणी ग्रंथकाराचे सिध्दांत म्हणजे मुर्ख माणसाच्या बाष्कळ बडबड्याचा अर्क वाटतात . वंशाच्या अनुषंगाने अनेक देशामध्ये विषमता दिसून येते. आर्यवंश श्रेष्ठ असा मानणारा एक वर्ग आहे .बाकी वंशातील मानवाना कनिष्ठ मानतात. प्रो.रिप्ले यांनी युरोपिय लोकांच्या वंशाचे प्रकार सांगितले आहेत.आर्य या शब्दाचे वेगवेगळेल पैलू मँक्स मुल्लरने वेगवेगळ्या ग्रंथाच्या साहाय्याने समजावून सांगितले आहे.

जगातील वंश हे एकप्रकारचे नसून त्यातील उंची ,रंग, आकार,ठेवण,यावरून पाडलेले आहेत.आर्यवंश ,दास,दस्यू इत्यादी संबंधीचे सिध्दांताचे निष्कर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलप्रमाणे मांडले आहेत,१) आर्यवंश अस्तित्वात होता , याबद्दल वेदामध्ये काही पुरावे मिळत नाही.२) आर्यवंशीय लोकांनी हिदुस्थानावर स्वार केली व तेथील मुळचे लोक दास्य व दस्यू यांना आर्यानी जिंकले याबद्दल वेदात काही पुरावा मिळत नाही.३)आर्य ,दास व दस्यू यांच्यात वांशिक भेद होता हे दाखविणारा एकही पुरावा वेदामध्ये नाही.४) आर्य रंगाने दास व दस्यू यांच्यात निराळे होते असे दाखविणारा पुरावा वेदामध्ये नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हणाच्या कुटील प्रवृत्तीवर आसूड ओढले असून , समाजातील एक भाग अवनित ठेवून देशाच्या व समाजाचा विकास रोखला होता.

*आर्याचा परस्परातील झगडा* या प्रकरणात काही लोक आर्यानी हिदुस्थानावर स्वारी करून दास व दस्यू यांना जिंकले हा सिध्दांत उचलून धरतात पण ऋग्वेदातील काही ऋचांकडे कानाडोळा करतात.ऋग्वेदातील ऋचांचा आढावा घेतल्यास तर ते सिध्दांत व्यर्थ वाटतात. यामध्ये भारतात आर्यची दोन वंश अस्तित्वात होते असे दिसून येते या वंशात लढाया होऊन एक वंश श्रेष्ठ ठरला तो म्हणजे आर्य होय.

शूद्र आणि दास या प्रकरणात दास म्हणजे शेतीवर काम करणारा तर शूद्र म्हणजे”जे युध्दात पकडले गेले त्याच्यावर गुलामगिरी लादण्यात आली आणि हे गुलाम लोक म्हणजे शूद्र लोक होत अशी मांडणी केली आहे.शुद्र हे अनार्य आहेत असे दाखविणारे जे पुरावे धर्मसुत्रात आढळतात ते विश्वसनीय म्हणून गाह्य पकडा येणार नाही.यासाठी आपल्याला विविध ब्राम्हणी ग्रंथाचा आधार घ्यावा लागेल ,मैत्रायणी संहितात शूद्र गरीब व हीन दर्जाचे लोक नव्हते,तर ते श्रीमंत होते अशी माहिती मिळते . युरोपिय ग्रंथानी जे दाखले दिले ते दाखले शूद्र पूर्वी कोण होते? व ते चवथा वर्ण कसे झाले या प्रश्ननाची उत्तरे देत नाही म्हणून हा सिध्दांत उपयोगी पडत नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी *शूद्र पूर्वी क्षत्रिय होते **? या प्रकरणात स्वतःचे सिध्दांत मांडले आहेत ते लिहितात की,”१) शूद्र पूर्वी आर्य होते.२) शूद्र क्षत्रिय वर्णाचे होते.३) शूद्रांचा समाज क्षत्रिय वर्णात इतका प्रबळ समाज होता की,प्राचीन काळच्या अत्यंत प्रमुख व प्रबळ आर्य जातीतील राजांपैकी बरेच राजे शूद्र होते.हा सिध्दांत अनेक जन मान्य करणार नाही पण मी माझी जोखीम उचलतो .मी मांडलेले शूद्राविषयीचे सिध्दांत अभ्यासकाला उपयोगी नक्कीच ठरणार यात शंका नाही.
शूद्र पूर्वी क्षत्रिय होते हे सिध्द करताना महाभारताच्या शांती -पर्वातील ६० व्या अध्यायातील ३८-४० श्लोकाचा उपयोग केला आहे.

प्राचीन काळी पैजवान नावाच्या शूद्रांने आपल्या यज्ञाच्या समयी ऐन्द्राग्नी कायद्यान्वये एक व पुर्णपात्रांची दक्षिणा वाटली. या सिध्दांतासाठी त्यांनी विविध लिपीतील ग्रंथाचा आधार घेतला आहे.पैजवन कोण होता यासाठी निरुक्त २-२४ मध्ये यास्क म्हणतो,”द्रष्टा विश्वामित्र हा पिजवनचा मुलगा सुदास याचा पुरोहीत होता.विश्वमित्र हा सर्वाचा मित्र होता.सर्व एकत्र फिरत होते.सुदास हा अति उदार दाता होता.पैजवान हा पिजवनचा मुलगा होता हे आढळून येते. पैजवान हा शूद्र आर्य असावा आणि तो क्षत्रिय असावा आणि राजा असावा! सुदासाबद्दल जो हा गौप्यस्फोट आलेला आहे त्याला इतिहासात तोड मिळेल काय? ही जी घटना आली ती अत्यंत क्रांतिकारक आहे.तिच्यापेक्षा अधिक मोठी क्रांतिकारक गोष्ट कोणती असू शकेल.ही बाब त्यांनी अधोरेखित केली आहे. ब्राम्हणी वाड्ःमय चाळून पाहिल्यावर सुदास नावाचे तीन इसम आहेत हे लक्षात येते . विविध ग्रंथाच्या आधारे सुदास यांच्या कार्याला माहिती आपल्याला दिसून येते.

शूद्र हे पूर्वी आर्य होते असा जो प्रो.वेबर यांनी निष्कर्ष आहे तो शंभर टक्के बरोबर आहे. शूद्र हा शब्द एका टोळीचे नाव दर्शविणारा शब्द होय की काय हा एकच संशयास्पद मुद्दा शिल्लक राहतो परंतु शूद्र हे आर्य व क्षत्रिय होते यात तिळमात्र शंका नाही.असा सिध्दांत मांडला आहे.
*वर्णाची संख्या तीन की चार *या प्रकरणात शूद्र जर क्षत्रिय होते हा सिध्दांत मान्य केला तर फक्त तीनच वर्ण अस्तित्वात होते हा सिध्दांत स्पष्ट करुन दाखवला आहे.ऋग्वेदात वर्ण व्यवस्थेला आधार मिळत नाही.यामध्ये ब्राम्हण , क्षत्रिय,वैश्य या तिन्हाचा उल्लेख आपल्याला दिसून येते .शतपथ ब्राम्हण व मैत्तिरीय ब्राम्हण या ग्रंथातही फक्त तीनच वर्णाची माहिती दिसते मग चवथा वर्ण कसा निर्माण झाला तर ऐकेकाळी आर्य समाजात तीन वर्ण अस्तित्वात होते आणि शूद्र दुस-या वर्णाचे म्हणजे क्षत्रिय वर्णाचे होते हे सिध्द होते.

ब्राम्हण व शूद्र यांचा झगडा या प्रकरणात शूद्र व ब्राम्हण यांच्यात सातत्याने झगडे होत होते या झगड्यामूळेच शूद्राला ही अवनत दशा प्राप्त झाली . त्यासाठी शूद्र राजा सुदास व ब्राम्हण ऋषी वसिष्ठ यांच्यात प्राणांतिक झगडा झाले होते.वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यवाहीमुळे ब्राम्हण व शूद्र यांच्यात मोठे आंदोलन पेटले त्यात शूद्र वर्ग हा पराजय झाला म्हणून त्याची गणना चवथा वर्णात केली ही जाणीव इतिहास कोणालाही करून देईल.

*ब्राम्हणानी शूद्रांना अधोगतिस कसे नेले ?*†यासाठी ब्राम्हणानी जे तंत्र वापरले ते म्हणजे शूद्रांचा उपनयनविधी करण्यासाठीचा नकार .या तंत्रामुळे ब्राम्हणांनी आपला हेतू साध्य केला व शूद्रांवर पुरा सूड उगवला त्यामुळे शूद्र अधोगतीसस गेले.

*समेटाची हकीकत *या प्रकरणामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिहितात की,” हिंदी-आर्य समाजाचे शूद्र आणि हिंदू समाजाचे शूद्र हे दोन निरनिराळे व परस्परापासून भिन्न स्वरूपाचे लोक आहेत हे सत्य आहे याची जाणीव एकेकाळी धर्मशास्त्रकाराच्या मनाला होती. सत्छूद्र आणि असत्छूद्र या दोन वर्गामध्ये व अनिर्वासित शूद्र आणि निर्वासित शूद्र या दोन वर्गामध्ये धर्मशास्त्रकारांनी जो भेदभाव करून ठेवला आहे ,त्यावरुन या गोष्टीची सत्यता पटते . सत्छूद्र म्हणजे सुसंस्कृत शूद्र, असत्छूद्र म्हणजे असंस्कृत शूद्र.निर्वासित शूद्र म्हणजे खेड्यातील जमातीत राहणारा शूद्र,अनिर्वासित शूद्र म्हणजे खेड्यातील जमातीच्या बाहेर राहणार शूद्र. “ही सत्य मांडणी केली आहे.सिध्दांताची कसोटी ,या प्रकरणात शूद्रांची उत्पत्ती कशी झाली व त्याची अधोगती कोणत्या कारणामुळे घडून आली याचा शोध लावणे हा या ग्रंथाचा हेतू होता . वेगवेगळ्या ग्रंथाच्या अभ्यासावरून शूद्र वर्ण हा क्षत्रिय वर्ण होता हे स्पष्टीकरणासह सिध्द करून दाखविले आहे.

शूद्र पूर्वी कोण होते? हा ग्रंथ इतिहास कालिन संशोधनाच्या सर्व पातळ्यावर खरा उतरला आहे.भारतीय समाजातील जातीची उतरंड ही वर्ण व्यवस्थेच्या वेळी निर्माण झाली नव्हती तर ती मनुस्मृतीच्या नंतर निर्माण केली गेली . संशोधन करताना ते कोणत्याही अवास्तव वृत्तीच्या आहारी गेले नाही हे या ग्रंथाची जमेची बाजू आहे. शूद्रांची उत्पत्ती कशी झाली आणि त्यांची अधोगती कोणत्या कारणामुळे घडून आली याचा शोध लावणे ,हा मुख्य हेतू या प्रबंधाचा दिसते.शूद्र वर्णाच्या माणसाला अधोगतीस लावणारी चातुर्वर्ण्याच्या दृष्कलंकित षडयंत्राचे चिकित्सक विश्लेषण बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.