प्रितिका उषमवार बी ए तृतीय वर्षात पानसरे महाविद्यालयातुन प्रथम

30

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.27नोव्हेंबर):-येथील कु प्रितिका प्रभाकर उषमवार ही हुतात्मा पानसरे महाविद्यालयाची विद्यार्थीनी बी ए तृतीय वर्षात महाविद्यालयातुन सर्वप्रथम आली आहे.

तिला ८०.६० %गुण प्राप्त असून संस्थेचे अध्यक्ष मनोहरराव देशपांडे ,सचिव सुनील बेजगमवार, उपाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर ,कोषाध्यक्ष गंगाधर सब्बनवार ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए.एच. श्रीरामे यांच्या सह प्राध्यापकवृद नि तीचे स्वागत केले आहे.

पालक प्रभाकर उषमवार यांचे महाविद्यालयात सत्कार करण्यात आला ,गरीब परिस्थिती वर मात करून प्रितिकाने हे यश प्राप्त केले या यशाचे श्रय तीने आई वडील व गुरुजनांना दिले आहे.