संविधान दिन उत्साहात संपन्न

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.27नोव्हेंबर):- सामाजिक समरसता मंच चंद्रपूर च्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अध्यक्ष स्थानी संजयजी जांपालवर, प्रमुख वक्ते सूदर्शनजी नैताम, सामाजिक समरसता मंचचे संयोजक डॉ नंदकिशोर मैंदळकर, सचिन बरबतकर,गंगाधर गुरनुले,नितीन चांदेकर,तुषार अक्केवार, ओंकार मैंदळकर,गौरव अक्केवार,कृष्णा नरडे, अथर्व अक्केवार,राजू कांबळे,विनोद करमरकर, अमोल कांबळे,पुष्पक मैंदळकर, स्वप्नील सुत्रपवर,किशोर जांपालवर,आदी उपस्तीत होते.

उधबोधनात सुदर्शनजी म्हणाले संविधानाचा गाभा व मसुदा डॉ बाबसाहेबांचीच देणगी होय,अनेक भेदभाव व विभिन्नता असलेल्या देशाला एकता व अखंडतेचा मूल मंत्र दिला.साम्राज्यशाही,राजेशाही,सरंजामशाही यांच्या चक्कीत भारडल्या जाणाऱ्या जनतेला मूलभूत मानवी अधिकार यव्ही ओळख करून दिली प्रौढ माताधिकार यांच्या योगाने सर्व सामान्य माणसांना राजकीय शक्ती प्रदान केली.राजकीय सामाजिक धार्मिक सतेच्या गुलामांना नागरिकत्व बहाल केले.या संविधानाने हिंदुस्थान सारख्या विशाल देशात विधीचे राज्य स्थापन केले व 125 कोटी जनतेला राजकीय स्थैर्य दिले.

डॉ नंदकिशोर मैंदळकर यांनी उद्देशिकेचे वाचन व संविधान संमधीचे नारे लावले संविधान प्रत्येक व्यक्तीला कसे उपयुक्त आहे यावर प्रकाश टाकला व ते घरा घरात पोहचविण्यात यावा असे आवाहन करण्यात आले प्रास्ताविक व संचालन डॉ नंदकिशोर मैंदळकर आभार सचिन बरबतकर यांनी केले.