आनंदवन प्रकल्पाच्या सीइओ डॉ. शितल आमटे यांनी केली आत्महत्या

40

🔺महारोगी सेवा समितीसह महाराष्ट्रात उडाली खळबळ

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.30 नोव्हेंबर):-जगात प्रसिध्द असलेल्या स्वर्गीय बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी विष घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली असून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे- करजगी ह्या काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या अशी चर्चा असून या घटनेचे कारण समजू शकले नाही.

शितल आमटे यांची मानसिक स्थिती का बिघडली ? त्यामागे काय गुपित आहे ? या प्रश्नाची उकल येणाऱ्या काळात तर होईलच मात्र त्यांनी मानसिक नैराशापोटी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.