मोक्का अंतर्गत दोघांवर कारवाई

66

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.30नोव्हेंबर):- तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील अनेक गुन्हे दाखल असलेले जावेद काळे, वर्धनगड. आणि संकेत काळे ,कुरोली तालुका खटाव जिल्हा सातारा यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली सपोनि विश्वजीत घोडके यांनी हा प्रस्ताव कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेकडे पाठवला होता. जावेत काळे आणि संकेत काळे या दोघांवर खटाव तालुका आणि परिसरात दरोडा चोरी असंय गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्यांनी या परिसरात दहशत पसरली होती या दोघांवर मोक्कांतर्गत कारवाई करून कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक आंकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन डीवायएसपी बी.बी महामुनी गणेश केंद्रे, यांनी केला होता. त्यांना पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे , सुधाकर भोसले, सचिन माने, विजय खाडे, सचिन जगताप, यांच्या पथकाने अटक केली होती.