विधानपरिषद निवडणुकीत अमरीशभाई पटेल यांचा दणदणीत विजय

31

🔹आ. जयभाऊंची रणनीती यशस्वी

✒️संजय कोळी(दोडईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.3डिसेंबर):-धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणणुकीत भाजपाचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांचा दणदणीत विजय झाला असून त्यांना ३३२ मते तर विरोधातील उमेदवारांला अवघे ९८ मते मिळाली आहेत.. भाजपाने माजी मंत्री व कुशल रणनीतीकार जयकुमारभाऊ रावल यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी दिली होती व त्यात ते यशस्वी झाले आहेत.

भाजपाने आ. जयभाऊंवर आजपर्यंत जी ही निवडणुकीची जबाबदारी दिली आहे त्यात ते यशस्वी झालेच आहेत, या निवडणुकीतही त्याचा प्रत्यय आला असून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांचा संबधामुळे अमरीशभाई पटेल यांना विरोधकांची सुध्दा मते मिळाली आहेत.. यातून आ. जयभाऊंची रणनीती यशस्वी झाली आहे.. ज्यांच्या नावातच जय आहे, तिथे विजय पक्काच असतो..विजयी झालेल्या अमरीशभाईंचे व किंगमेकर जयभाऊंचे ही अभिनंदन.!!