मास वापरा अन्यथा दडांत्मक कार्यवाही – आय.पी.एस.पंकज कुमावत

33

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोडाईचा(दि.3डिसेंबर):- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी कोरोना वाढण्याची भीती कायम असल्याने नागरिकांनी बाहेर जाताना मास वापरले पाहिजे परंतु नागरिकांना कोरोनाची भिती नाही त्यामुळे मास वापरत नाही.म्हणून दोडाईचा पोलिस व नगरपालिका प्रशासनाने आज गुरूवारी बाजाराचा दिवस असल्याने गर्दी होत असते गर्दी टाळण्यासाठी व लोकांनी मास वापरावे म्हणून शोध मोहीम राबवण्यात आली.

दोडाईचा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक पंकज कुमावत साहेब, नगरपालिका मुख्यधिकारी निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाने शिवाजी पुतळा पासुन तपासणी मोहीम राबवण्यात आली ज्यांनी मास लावले नाही त्यांना दंड आकारणी करून पुन्हा विना मास दिसले तर कार्यवाही केली जाईल अशी ताकिद देत कार्यवाही करण्यात आली या कार्यवाही पथकात पोलिस हवलदार साळवे,गुजराती, नगरपालिका कर्मचारी शिवाजी मराठे,महेंद्र शिंदे, सुधिर माळी,प्रकाश लहामगे, गोविंद मराठे, नितीन चौधरी, वसंत जोशी,धर्मेंद्र मोहीते या पथकाने कार्यवाही केली.