लोकजागर आभियान च्या केंद्रीय कार्यालयीन सचिव पदी प्रभाकर वानखड़े

36

🔹ओबिसी बांधवांकडुन केले जात आहे अभिनंदन

✒️ हर्शल बीजवे(विशेष प्रतिनिधी)मो:-9503683249

अमरावती(दि.3.डिसेंबर):-येथिल ओबिसी समाजातील चळवळीतील धाडाडीचे नेतृत्व,सामजसेवक,साहित्यिक,प्रभाकर वानखड़े यांची लोकजागर ओबिसी जनगनना सत्याग्रह च्या केंद्रिय कार्यालयीन सचिव मुंबई पदी निवड झाली आहे.
सदर निवड ही लोकजागर ओबिसी जनगणना सत्याग्रह आभियान चे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रिय अध्यक्ष प्रा.वाकुड़कर यांच्या निर्देशनानुसार राष्ट्रीय महासचिव महादेव मिरगे यांनी केली आहे.

श्री.वानखड़े हे बहुआयामी व्यक्तिमत्व असुन विविध सामजिक संस्था ओबिसी समाज यासाठी नेहमी प्रयत्नशील,साहित्यिक ,सामजिक संघटना इ.मध्ये अग्रेसर आहे.या संघटनांंमध्ये अनेक महत्वाची पद भुषविले आहे. आमची जनगनना आम्हीच करनार,52 %ओबिसिंना 52%आरक्षण,ओबिसी मुख्यमंत्री बहुजन सरकार या त्रिसुत्री तत्वावर कार्य करण्यासाठी श्री.वानखड़े यांची नियुक्ती करण्यात आली आहे.