ऑनलाईन मैत्रीच्या संपर्कातून लाखो रुपयांना गंडा

33

🔺दहा बँक खाती सील: नायजेरियन तरुणासह एकास अटक

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.4डिसेंबर):- महिलेने नाशिक येथील व्यापाऱ्यांसोबत मैत्री करत ऑनलाइन चॅटिंग सुरू केली बोरटड फार्मासिटिकल नावाची कंपनीमध्ये नोकरी करते असल्याचे भासवणे आमच्या कंपनीला रॉ मटेरियल ची गरज आहे असे सांगत त्या महिलेने वेगवेगळ्या बँक खाते मधून वेळोवेळी रक्कम भरण्यास सांगून तब्बल १९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस कमिशनर दीपक पांडे उपयुक्त निशाणदार यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक श्रीपाद पुरोपकी देवराज बोरसे यांनी या प्रकरणात तत्काळ दिल्लीला पाठवण्याचे आदेश निशाणदार दिले तांत्रिक विश्लेषण शाखेची मदत घेत उपनिरीक्षक मंसुरी यांचे पथक राहुल जगताप अंकिता निकम भूषण देशमुख यांना दिल्ली रवानगी केली या पथकाने दिल्ली येथील उत्तम नगर मधील बँक वर लक्ष केंद्रित तेथे दोघांना ताब्यात घेतले.