प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांगांच्या वैद्यकीय तपासनी संदर्भात वैद्यकीय अधिक्षकांना दिले निवेदन

41

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतीनीधी)मो.:-307896949

मुखेड(दि.4डिसेंबर):/कोरोना महामारीच्या कालात बंद केलेली दिव्यांगांची औनलाइन तपासनी पुन्हा चालू करण्यासाठी 4 तालुक्यांच्या अध्यक्ष्यांनी वैध्यकिय अधीक्षक उप जिल्हा रूग्नालय मुखेड यांना निवेदन दिले.

त्यात नायगाव तालुका अध्यक्ष श्री. साईनाथ बाबाराव बोईनवाड, मुखेड तालुका अध्यक्ष सौ.राजाबाई गोविंदराव गवलवाड ,धर्माबाद तालुका अध्यक्ष श्री. साईनाथ पा.जुन्नीकर,देगलुर तालुका अध्यक्ष श्री विरभद्र चेंडके यांनी निवेदन दिले व या निवेदनास वैध्यकिय अधिक्षक डॉ.श्री. आनंदराव पा.खतगावकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपन दिव्यांगांची बंद केलेली औनलाइन तपासनी पुर्ववत तत्काल चालू करणार असल्याचे स्पष्ट केले.

या शिष्टमंडलाचे नेतृत्व प्रहार दिव्यांग संघटनेचे नांदेड जिल्हा सचिव श्री मारोती मंगरूले व जिल्हा सहसचिव श्री. चांदू आंबटवाड कुंटूर कर,यांनी केले .या वेली सरोजना धारासुरे,चंदरबाई देवमारे व अन्य दिव्यांग बांधव हजर होते.