धुळे जि प कृषी समिती बैठकीत प्रगतीशील, उपक्रमशील आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान

32

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.5डिसेंबर):- न्याहळोद गावातील मा.श्री. बापूसाहेब खलाणे हे कृषी सभापती झाल्यापासून त्यांनी आपल्या संकल्पनेतुन कृषी समितीच्या प्रत्येक बैठकीत जिल्ह्यातील आदर्श, प्रगतिशील उपक्रमशील शेतकरी यांना आमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या अनुभव, मार्गदर्शनाचा,शेतीतील विविध उपक्रमाचा , तंत्रज्ञानाचा लाभ इतर शेतकऱ्यांना करून देणे हा स्तुत्य उपक्रम राबविणारे धुळे कृषी विभाग हे माझ्या माहिती प्रमाणे राज्यातील पहिला विभाग आहे असे कृषी भूषण अॅड.प्रकाश पाटील यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी त्यांच्यासह शेतीत विविध नवनवीन उपक्रम राबविणारे, सेंद्रीय शेतीतून फळे भाजीपाला आदींचे भरघोस उप्पन्न काढणारे प्रगतीशील आदर्श शेतकरी. नरेंद्र नथ्थु माळी(कापडणे )महिला शेतकरी सौ.शोभाबाई जाधव(निमडाळे ) यांचा कृषी- पशुसंवर्धन सभापती बापूसाहेब खलाणे ,कृषी विकास अधिकारी पी.एम.सोनवणे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.जि प कृषी समितीची रब्बी हंगाम आढावा बैठक कृषी सभापती यांचे दालनांत संपन्न झाली.

बैठकीत रब्बी हंगाम आढावा , कृषीकर्ज , पीक विमा योजना,सेंद्रीय शेती , शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, विजेचे प्रश्न आदी विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.यावेळी कृषी समितीचे सदस्य, जि.प. सदस्या सौ संजीवनी ताई सिसोदे , जि प सदस्य भीमराव ईशी , जिल्हा कृषी अधिकारी यु.टी.गिरासे , श्रीमती कावेरी राजपूत, जिल्हा अग्रणी बँकचे सरव्यवस्थापक श्री.एम.के.दास , कृषीतंत्र अधिकारी श्री. सी.जी.ठाकरे , प्र.मोहीम अधिकारी श्री.अभय कोर तसेच तालुका कृषी अधिकारी , विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते.बैठकीचे श्री.आर.एन.नेतनराव तालुका कृषी अधिकारी साक्री यांनी सूत्र संचालन केले