गंगाखेड येथे व्यापारी व हमाल असोसिएशन बैठक संपन्न

34

🔹दरवाढ बाबत झाले एकमत

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.5डिसेंबर):-आडत व हमाली दर वाढ करण्यासाठी व्यापारी व हमाल असोसिएशन गंगाखेड यांच्या संयुक्त विचाराणे, दिनांक 4/12/2020 रोजी मिटींग आयोजित करण्यात आली,होती.यावेळी मिंटिग मध्ये असे ठरले की दिनांक 4/12/2020 ते 4/12/2023 या कालावधीमध्ये आडत व हमाली दर वाढवण्यात आलीआहे.

यावेळी मार्केटचे श्री सचिन गायकवाड,आडतचे अध्यक्ष श्री बंडू धुले, सचिव श्री बालासाहेब भंडारी,हमाल युनियन जिल्हाध्यक्ष श्री शेख सरवर, तालुका अध्यक्ष श्री रोहिदास बदाले, उपाध्यक्ष श्री रमेश वाव्हळे,हमाल श्री लाला साळवे,श्री पंडितराव ढेंबरे, श्री व्यंकटराव प्रमोद धुळे, श्री विजय शर्मा, श्री आनंद धोका, श्री पवन दायमा, श्री चंद्रकांत काळे, श्री सचिन काकांनी, श्री गोविंदराव निरस, यांच्या समक्ष घेण्यात आलेल्या,मिटींगमध्ये दरवाढ करण्यात आली असे घोषित करण्यात आले.आडत व्यापारी व हमाल असोसिएशन यांच्या कडून दरवाढी बद्दल अभिनंदन व्यक्त केले.