माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक व परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची ग्रामस्थांची मागणी

32

✒️सचिन सरतापे (प्रतिनिधी,म्हसवड,माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.5डिसेंबर):-शिंदी बुद्रुक (ता.माण )येथील रमाई नगर व परिसरामध्ये गेले आठ ते दहा दिवसापासून विद्युत प्रवाह कमी जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून घरगुती वापराची विद्युत उपकरणे ,शेती करिता वापराची विद्युत उपकरणे कमी जास्त विद्युत प्रवाहांमुळे जळून खाक होत असल्याने सामान्य नागरीक शेतकरी याच मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून या नुकसानी कडे महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे महावितरण च्या ग्राहकांना व शेतकर्याना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सततचा विद्युत पुरवठा योग्य होत नसलेने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून याला संपूर्णपणे महावितरण कार्यालय जबाबदार आहे.

त्यामुळे या संपूर्ण प्रकारची दखल घेऊन परिसरातील विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण खरात,सचिन खरात,चैतन्य खरात,आणि सागर खरात यांनी महावितरण कार्यालय दहिवडी येथे निवेदन देऊन चर्चा केली यावर सहायक अभियंता श्री. देशमुख यांनी तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.