हणेगाव ग्रामपंचायतीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंगणे यांची भेट

26

🔹विविध कामाची केली पाहणी

✒️महादेव उप्पे(देलगुर प्रतिनिधी)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.5डिसेंबर):- तालुक्यातिल हणेगाव येथील ग्रामपंचायतीला नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंगने यांनी भेट देऊन विविध कामाची पाहणी केली यामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल शाळेची पाहणी करून त्यांनी शाळेची माहिती पाठविण्यास सांगितले व शाळेची झालेली दुरावस्था पाहिले.या शाळेच्या भिंतींना तडे बसले असून यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.यामुळे या शाळेची इमारत लवकरात लवकर बांधल्यास पुढील अनर्थ टळू शकतो.यावेळी शाळेचे परिसर व वसतिग्रहाची पाहणी करण्यात आली.

व तसेच पंतप्रधान आवास घरकूल योजनेतील मंजूर झालेल्या घराची व जागेची पाहणी करण्यात आले.हणेगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बी.जी.उमाटे यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद हायस्कूल शाळेस पाच लाखाची निधी देऊन दरवाजे ,खिडक्या आदिचे काम चांगल्या प्रकारे झाले व त्याची पाहणी करण्यात आली.शाळेच्या बांधकामाविषयी पत्रकारांनी विचारले असता प्रस्ताव पाठविण्यास सांगितले .यावेळी विविध कामाची पाहणी करण्यात आले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिंगणे,गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार,विस्तार अधिकारी सोनवने,विस्तार अधिकारी डि.व्हि.सुर्यवंशी,विस्तार अधिकारी एस.एम.कानडे,ग्रामविकास अधिकारी बी.जी.उमाटे आणि पत्रकार प्रशांत माळगे,किशोर आडेकर,महादेव उप्पे,धनाजी होटले,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सचिन भंडारे,माधव नामेवार,रामदास बैलवाड आदि उपस्थित होते.