मुख्याधिकारी यांनी घेतलीआरोग्य विभागाची ३ तासाची मॅरेथॉन बैठक

29

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.5डिसेंबर):–दि. ४ डिसेंबर रोजी मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण लक्ष्मण निकम यांनी दोंडाईचा वरवाडे नगर परिषद आरोग्य विभागाची प्रशासकीय बैठक घेतली,सदर बैठकीत प्रत्येक प्रभागातील मुकादम हे दैनंदिन स्वच्छतेचे कशाप्रकारे काम करून घेतात याबाबत माहित करून घेण्यात आली. तसेच सर्व कर्मचारी यांचे वार्ड निहाय नियोजन करण्यात यावे अशा सूचना दिल्या.

सदर बैठकीत नगरपरिषद क्षेत्रात यापुढे वेळोवेळी सूचना देवूनही उघड्यावर कचरा टाकणारे नागरिक व्यापारी दुकानदार,घरातील ओला व सुका कचरा विलगिकरण करून न देणारे,प्लास्टिक पिशवी वापर व विक्री करणारे नागरिक व्यापारी, डस्टबिन न ठेवणारे दुकान व लारिधारक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना नगरपरिषद आरोग्य विभागाचे सर्व मुकादम व स्वच्छता निरीक्षक यांना देण्यात आलेले आहे. दंडात्मक कारवाई करण्यासाठी संबंधितांना तसे लेखी आदेश व चालान पुस्तक देण्यात आले आहेत.

तसेच शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या डुकरांची संख्या पाहता शहरातील डुक्कर मालकांना कार्यालयात समक्ष बोलावून संबंधितांना नोटीस देण्यात आलेली आहे.तसेच डुक्कर मालकांनी काही दिवसात सर्व डुक्कर विल्हेवाट लावणे बाबत मान्य केले आहे.परंतु मालकांकडून सदरची पूर्तता न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही कार्यवाही करण्यात येणार आहे.

शहरात मच्छारांचा प्रादुर्भाव झालेला असून तो कमी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी फॉगिंग मशीनने धूर फवारणी करणे , नदीतील पाणी वाहते करणे, उघड्यावर सांडपाणी सोडणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे, साचलेल्या पाण्यावर तसेच गटारीतील साचलेल्या पाण्यावर ऑइल टाकने बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच भविष्यात प्रत्येक घरातील शौचालय सेप्टिक टँक वर जाळी बसवणे व सार्वजनिक गटारी जवळ जंतूनाशक पावडर टाकण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी यांनी आरोग्य व पाणीपुवठा सभापती यांचे मते जाणून व सूचना जाणून घेतल्या.आरोग्य सभापती श्री जितू सर यांनी शहरातील धूळ कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावे अशी सूचना केली.. यावेळी मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम,आरोग्य रक्षण समिती सभापती जितू सर, पाणीपुरवठा सभापती प्रवीण भाऊ महाजन,आरोग्य निरीक्षक शरद महाजन,आरोग्य विभाग कंत्राटदार प्रतिनिधी मिश्राजी, स्वच्छ भारत कन्सल्टंट निरज गांगराडे ,स्वच्छता मुकादम रघुनाथ बैसाने,गुलाब नगराळे,कांतीलाल मोहिते,हुसैन शेख,सफाई कामगार व जनजागृती कर्मचारी निलेश लोट,दगडू वानखेडे,मोहसीन शेख,राजा पंडित,भीमा लोंढे आदी उपस्थित होते…