करमाळा तालुक्यात बेवारस मृतदेह आढळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण

32

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.5डिसेंबर):-अर्जुननगर शिवारात एका 40 वर्षीय अज्ञात इसमाचा नग्न मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याची खबर करमाळा पोलिसांत नवनाथ रामदास पवार वय 28 रा.अर्जुननगर यांनी दिली आहे.

याबाबत ची हकीकत अशी की एक डिसेबर रोजी सकाळी करमाळा तालुक्यातील अर्जुननगर शिवारातील अशोक काटोळे यांच्या शेतातील चिलारीच्या झुडपात 40 ते 45 वर्ष वयाच्या पुरूष जातीचे नग्न व सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

याठिकाणी करमाळा पोलिसांनी भेट देऊन त्याचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी घटनास्थळी एक शाल व चप्पल असे साहित्य आढळून आले. या मृत्युबाबत करमाळा पोलिसांत अकस्मात मृत्यु ची नोंद केली आहे. याचा पोलिस हवालदार केदारनाथ भरमशेट्टी पुढील तपास करीत आहेत.