गडचिरोली जिल्ह्यात (6 डिसेंबर) गेल्या चोवीस तासात 40 बाधित तर 67 कोरोनामुक्त

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली,(दि.6डिसेंबर):;गेल्या चोवीस तासात जिल्हयात 40 नवीन बाधित आढळून आले तसेच 67 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8228 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7731 वर पोहचली. तसेच सद्या 412 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 85 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.96 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 5.01 टक्के तर मृत्यू दर 1.03 टक्के झाला.

नवीन 40 बाधितांमध्ये गडचिरोली 27, अहेरी 2, आरमोरी 1, भामरागड 1, चामोर्शी 1, धानोरा 5, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 2, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 1 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 67 रूग्णांमध्ये गडचिरोली 48, अहेरी 2, आरमोरी 0, भामरागड 3, चामोर्शी 4, धानोरा 3, एटापल्ली 0, मुलचेरा 1, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 3 व वडसा मधील 3 जणाचा समावेश आहे.

एकूण नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सी ६० जवान ४, शहरातील इतर ४, कन्नमवार वार्ड १, नवेगाव १, आरटीओ जवळ १, सुभाष वार्ड १, विवेकानंद नगर १, मोरेश्वर पेट्रोल पंपाजवळ १, शिवाजी नगर १, मार्कंडा दवाखान्याजवळ ३, गोकूळनगर १, हनुमान वार्ड १, एचपी गॅस गोडावून नवेगाव ४, पंचवटीनगर १ व रेव्हून्यू कॉलनी २ जणांचा समावेश आहे. अहेरी मधील १ आलापल्ली व शहरातील, आरमोरी मधील नरचूली येथील १ जण बाधित आढळला. भामरागड मधील लाहेरी मधील १ जण बाधित आढळून आला. जवाहर नगर मधील घोट येथील चामोर्शी मधील बाधित आढळला आहे. धानोरा मधील १ गट्टा, बंधेना १, सीआरपरएफ २ व पवनी १ जणांचा समावेश आहे. कुरखेडा मधील गुरनोली येथील २ जणांचा समावेश आहे. वडसा मधील बोलाडा येथील एक जण बाधित मिळाला.