नेर: नवे भदाणे येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

32

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.7डिसेंबर):- तालुक्यातील नवे भदाणे येथे ५ डिसेंबर रोजी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले नवे भदाणे गावातील बलवान क्रिकेट क्लब यानी स्पर्धा आयोजित केली आहे. यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील क्रिकेटपटूंनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हजेरी लावली होती. या क्रिकेट स्पर्धेत 60 संघ यात सहभागी झाले आहेत. नवे भदाणे येथील बलवान क्रिकेट क्लब यानी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत क्रिकेट पटू क्रिकेट खेळण्यासाठी,धुळे, नंदूरबार, जळगाव,नाशिक या जिल्ह्यातील मोठया प्रमाणात क्रिकेट प्रेमींनी खेळण्यासाठी हजेरी लावली आहे.

नवे भदाणे गावात तरुणांनी एकत्र येऊन क्रिकेट स्पर्धेसाठी झाडे झुडपे , काटेरी बांबुळ ट्रॅक्टर द्वारे या जमिनीवर मशागत करून गोलाकार, सुंदर असे मोठया प्रमाणाचे क्रिकेट साठी ग्राउंड तयार करण्यात आले आहे.

म्हणुन या बलवान क्लब क्रिकेट टीमचे परिसराती कवतुक करण्यात आले. यात प्रथम पारितोषिक स्व.आप्पा सखाराम श्रीराम तिसऱ्या पुण्यस्मरणार्थ BCC ग्रूप कडून ३१,००० हजार देण्यात येणार आहे. द्वतीय पारितोषिक स्व.अॅव्होकेट श्रीराम व झगु सखाराम श्रीराम यांच्य पुण्यस्मरणार्थ डॉ. प्रशांत श्रीराम यांच्याकडून ११,००० हजार व श्री गोकुळ श्रीराम यांच्या कडून ५,००० हजार असे एकूण १६,००० हजार रुपये देण्यात येणार आहेत. तृतीय पारितोषिक विजय श्रीराम यांच्याकडून ३५००, आणि सूरज मारणार यांच्या कडून ३५०० असे ७,००० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

व १८ ट्रॉफी चे पारितोषिक वितरण समारंभ करण्यात येणार आहे. हि क्रिकेट स्पर्धा NH-6 महामार्ग, नवे भदाणे येथे आयजित करण्यात आली आहे. व आज ५ डिसेंबर रोजी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी स्व आप्पा सखाराम श्रीराम यांच्या 3 पुण्यतिथी निमित्ताने भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली बलवान क्रिकेट क्लब (B.C.C) प्रमुख अतिथी डॉ प्रशांत बी श्रीराम,शंकर खलाणे ग्रामपंचायत सदस्य,गणेश जयस्वाल,गंगाराम मारणार,मधुकर श्रीराम,आण्णा कारंडे,जीभाऊ कर्नर, आप्पा खताळ, शालीक गोयेकर, गोकुळ कारंडे,गोकुळ खताळ, संतोष ईशी , केतन शिंदे, राजू कारंडे, सजु श्रीराम, नाना कारंडे,राघू खताळ,विकास मारणार,साहेबराव कारंडे,विजय श्रीराम,गुलाब कर्नर,दगडू गोयेकर,भैय्या सरगर,दीपक कर्नर,जयदीप खताळ, आण्णा सोनवणे, भाऊसाहेब खताळ सुरज मारणार व बलवान क्रिकेट क्लब व आदी उपस्थित होते.