दिड वर्ष फरार असलेल्या आरोपीला कुंटूर पोलिसांनी केले अटक

23

✒️अशोक हाके(विशेष प्रतिनिधी)मो:-9970631332

नायगाव(दि.7डिसेंबर):- तालुक्यातील दुगाव ग्रामपंचायत कार्यालय येथील ग्रामसेवक यांनी पदावर असताना व निलंबित झाल्यावर चौदावा वित्त आयोगाच्या ७ लाख १० हजार रुपये शासन निधीचा अपहार करून फसवणूक केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करून दिड वर्षांपासून फरार असलेल्या व कलम ४२०,४०९ भदवी गुन्ह्यातील निलंबित ग्रामसेवकास अखेर कुंटूर पोलिसांनी सापळा रचून अटक केले आहे.

या प्रकरणा मधील ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय दुगाव येथे कार्यरत असलेला निलंबित ग्रामसेवक यांनी मागील दिड वर्षांपासून पोलिस ठाणे कुंटूर गुन्ह्यामध्ये व पोलिस स्टेशन कुंडलवाडी व पोलिस स्टेशन नायगाव येथील गुन्ह्यामध्ये शासनाच्या चौदावा वित्त आयोगाचा ७ लाख १० हजार रुपयांचा उपहार करून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून दिड वर्षांपासून फरार होता.

सदर प्रकरणातील निलंबित ग्रामसेवकास दिनांक ५ डिसेंबर २०२० रोजी कुंटूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम खान पठाण , उपनिरीक्षक दिनेश येवले याना गुप्त बातमीदारा मार्फत महिती मिळाल्याने सदर गुन्ह्यातील निलंबित ग्रामसेवक हा त्याच्या गावाकडे येणार असल्याची खात्रीशीर बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्यानंतर सपोनि कारीमखान पठाण यांच्या सोबत दिनेश येवले , कुंटूर चे कर्तव्यदक्ष बिट जमदार पोना. शेख अब्दुल बारी ,पोकॉ. उद्धव कदम ,पोकॉ.विवेक ईश्वरे ,शंकर बुद्धेवाड, चालक सदाशिव पाटील खतगावकर ,यांनी उमरा येथे तात्काळ जाऊन सापळा रचून सदर प्रकरणातील ग्रामसेवकास पकडून दिनांक ५ डिसेंबर २०२० रोजी अटक करण्यात आले आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कारीमखान पठाण हे करीत आहे.