नाशिक येथील पोलीस महानिरीक्षक कार्यालया परिसरातून ३१हजाराची चोरी

26

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.7डिसेंबर):-तांब्याच्या वायरीचा बंडल लंबविल गडकरी चौकातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या आवारात अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील बाजूने प्रवेश करत भिंतीवरुन ३१हजार रूपये किंमतीचे तांब्याच्या वायरी बंडल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे शहर व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाले असून नागरिकांच्या घरामधील ऐवज वाहने असुरक्षित तर आहेच मात्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात चोरांनी धाडसी चोरी करून पोलीस प्रशासनाला आव्हान दिले आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील समर्पण सभाग्रह जवळ तांब्याची वायरचा बंडल चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला याप्रकरणाची हवलदार अर्जुन खेलकर यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे , चोरट्याने पोलीस प्रमुखाच्या कार्यालयात चोरी करण्याचे धाडस दाखविले असल्याने पोलीस प्रशासन कार्यालय सुरक्षेची अशी अवस्था असेल तर अन्य सरकारी आस्थापनाच्या सुरक्षेसाठी नेमकी काय स्थिती असेल याची कल्पना ना केलेली बरी.