12 व 13 डिसेंबरला महारोजगार मेळावा

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.7डिसेंबर):-कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते व त्यांचा परिणाम उद्योग, व्यवसायावर झाला होता. परंतु आता राज्यात उद्योग, व्यवसाय पुर्ववत कार्यरत झाले आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. रोजगाराच्या या संधीचा लाभ राज्यातील उमेदवारांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत दिनांक 12 व 13 डिसेंबर 2020 या दोन दिवसांच्या कालावधीत राज्यस्तरीय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

त्याअनुषंगाने शासनाच्या http:www.mahaswayam.gov.in पोर्टलवर सदर रोजगार मेळाव्याचे इव्हेंट क्रीएट करण्यात आले आहे.
सदर महारोजगार मेळावा हा उद्योजक तसेच बेरोजगार उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक आस्थापना, हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने, व निरनिराळे औद्योगिक संस्था यांनी त्यांच्या आस्थापनांमधील रिक्त पदे भरण्याकरिता सदर वेबपोर्टलवर नोंदणी करुन मागणी नोंदवावी. मेळाव्यामध्ये आपला सहभाग घेण्याकरिता उद्योजकांनी व उमेदवारांनी http:www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर भेट द्यावी. तसेच उमेदवार mahaswayam App हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन सुध्दा या सर्व सुविधाचा लाभ घेवू शकता. एका अर्थाने नोकरीच्या शोध आता आपल्या हाताच्या तळव्यावर उपलब्ध झालेला आहे.

विशेष म्हणजे याबाबत कोणतेही नोंदणी शुल्क नसून सदर मेळाव्यामध्ये मोफत सहभाग घेता येणार आहे.
याबाबत काही अडचन किंवा मदत हवी असल्यास दूरध्वनी क्रमांक 07172-252295 यावर संपर्क साधावा. सर्व आस्थापना व नोकरी ईच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भै. गो. येरमे यांनी केले आहे.