विदर्भवाद्यांनी विज बिल व विदर्भासाठी ठिय्या आंदोलन

34

🔹विदर्भवाद्यांनी केले वीज बिलाची होळी

🔸विदर्भवादी आक्रमक भूमिकेत

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपूरी(दि.7डिसेंबर):- विदर्भवाद्यांनी ब्रह्मपुरी शहरात बाजार चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन व विज बिलांची होळी करण्यात आले.कोरोना काळातील विदर्भातील सर्व जनतेचे विज बिल सरकारने भरावे व जनतेला विज बिल मुक्त करावे त्यानंतर दोनशे युनिट पर्यंत विज बिल मोफत करा त्यानंतरचे विज बिल निम्मे करा तसेच विदर्भामध्ये सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये अतिवृष्टी मुळे विदर्भातील शेतकऱ्यांची प्रचंड आणि झाली आहे.

33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्याच्या नुकसानांची भरपाई प्रती हेक्टर 25000 रूपये द्यावे. व स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी या सर्व मागण्या धरून विदर्भ युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष सुदाम भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवारला बाजार चौक महात्मा गांधी त्यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन व वीज बिलाची होळी करण्यात आली.

यावेळी विदर्भवादी नेते सुखदेव जी प्रधान सर, विनोदी झोडगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निखिल डांगे मयूर मेश्राम अमर गाडगे, संदीप कामडी,रवी चामलवार ,रत्नदिप मेत्राम,पूजा शेडमाके,उषा उईके,शिला मरसकोल्हे,निलीमा उईके आदी विदर्भवादी उपस्थित होते.