महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संत रविदास मित्र मंडळाचे नायगांवात अभिवादन

38

✒️शिवानंद पांचाळ(नायगाव प्रतिनिधी)मो:-९९६०७४८६८२

नायगाव(दि.8डिसेंबर):-ज्ञानाचे अथांग महासागर, महामानव,क्रांतीसुर्य ,भारतीय राज्यघटनेचे निर्माते, बोधीसत्व विश्वरत्न,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नायगांव येथे विनम्र अभिवादन दि.६ डिसेंबर २०२० महामानव, विश्वरत्न,परमपूज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन याप्रित्यर्थ व कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता श्रीनिवास पाटील चव्हाण रमेश पाटील शिंदे तसेच संत रविदास मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र तुकाराम कांबळे व सर्व सामाजिक कार्यकर्ते सकाळी ९ वाजता नायगांव येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले, नंतर श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या हस्ते दिप प्रजलन करुन,सामुहीक बुध्द वंदना घेण्यात आली.

उपस्थित मान्यवरांनी अभिवादन करुन बाबासाहेबांसाठी दोन शब्द व्यक्त करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले,जर आज ही समाजाची स्थिती असेल तर त्यावेळी बाबासाहेब राहीले नाहीत ही बातमी सैरावेरा पसरता लोकांची काय अवस्था असेल हे शब्दात ही व्यक्त होऊ शकत नाही,जो ज्या अवस्थेत असेल तसाच रडत आक्रोश करत पळत सुटायचा सर्वत्र पुरासारखा आक्रोश, दुख व जनसागर दिसत होता,अशा हया महामानवाला अभिवादन करतानाही माणुस भाऊक होतो.बाबासाहेबांच्याच विचारावर चालुन आपला ऊध्दार होऊ शकतो तसेच संविधानाचे काटेकोर अंमलबजावणी केली तर च प्रबुध्द भारत घडु शकेल,असा संदेश देण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने श्रीनिवास पाटील चव्हाण,रमेश पाटील शिंदे नगरसेवक, आर.आर शिंदे,सर,एस टी जाधव सर,जी व्ही कोलमवार सर,श्री गंगाधर पांचाळ सर ,पि एच कदम सर , नलबरवार सर,गंगाधर सोनटके, संतोष हवेलीकर, पांडुरंग हवेलीकर,संजय सोनटके,कपिल पाटील कुरे,श्रानेश्वर सोनटके, राजू तुळशीराम वाघमारे, नागेश लक्ष्मण भालके, मोहन गधारे, संजय तुकाराम कांबळे, नारायण हवेलीकर,राजू सोनटके, मारुती गंगासागरे, संदीप बालकोंडे, अजय गंगासागरे, विजय गंगासागरे,राहुल हावेलीकर साईनाथ सोनटके, मोहन गधांरे, यांनी उपस्थिती होती