बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया तर्फे महापरिनिर्वादिनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

49

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.8डिसेंबर):-भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडिया चे सल्लागार सुभाष मेश्राम, राज्याचे सह सचिव मुन्ना आवळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र येसांबरे, कार्याध्यक्ष सुरेश शंभरकर, जिल्हा सचिव नितीन गेडाम, जिल्हा सल्लागार नवनाथ देरकर, रिपब्लिकन मजूर संघटनेचे सचिव राकेश कालेशवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.