दिग्रस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी काव्य व गीत गायन आदरांजली

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.8डिसेंबर):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काव्य व गीत गायनाने आदरांजली देण्याचे आयोजन स्थानीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडगिलवार लेआउट येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनिताताई भालेराव ह्या होत्या.

तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी वाल्मीक इंगोले ,मुख्याध्यापिका रूपाताई मानकर, तालुकाध्यक्ष विनायक देवतळे, महादेव धुळध्वज हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप नगराळे यांनी केले.

या काव्य गायन स्पर्धेत वैशाली कांबळे, सारा देवस्थळे, प्रशांत खंडारे ,अजिंक्य भगत ,उत्तम मनवर, अतुल तलवारे, उज्वला मानकर, रूपा मानकर ,धरती उंमरे, वैशाली गावंडे ,वनमाला भालेराव, डॉ. रूपेश कऱ्हाडे यांनी सहभाग घेतला होता.

तर गीत गायन स्पर्धेत कुसूम जांगडे, बंडू खडसे, लता भरणे, संघपाल गजभिये ,सुनिता मनवर ,पुरुषोत्तम मेश्राम, नंदलाल कांबळे ,उमा खंदारे , मोतीराम गजभार ,नंदराज गुजर यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा. डॉ. गौतम जळगावकर, प्रा. निलेश गायकवाड, प्रा. संजय मोटे यांनी कार्य पार पडले.

काव्यगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रशांत खंडारे ,द्वितीय क्रमांक वैशाली गावंडे , तृतीय क्रमांक उज्वला मानकर यांना देण्यात आला.तर गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक संघपाल गजभिये ,द्वितीय क्रमांक मोतीराम गजभार व तृतीय क्रमांक कुसुम जांगडे यांना देण्यात आला.

यावेळी चिंतामण मनवर, रमेश वहिले, यशवंत भरणे,भानुदास भगत,भीमराव नगराळे,नंदु गुजर, प्रा. संजय देवस्थळे, प्रा. त्रिपाल राहुलगडे, प्रा. रमेश भोवते , प्रा. मधुकर वाघमारे ,मनोरमा डबले,विना भगत,चक्रधर वाघमारे, प्रा.मोरेश्वर उईके, मोतीराम अगमे, अशोक कांबळे, सुरेश वानखेडे ,नरेंद्र फुलझेले, सदानंद उमरे सुभाष मोहोड, उत्तम इंगोले ज्योती वहिले, लता भरणे , पुष्पा वानखेडे ,प्रज्ञा नगराळे ,ममता मेश्राम हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रूपेश कऱ्हाडे यांनी केले तर एकनाथ मोगले यांनी आभार मानले.या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.