हभपश्री निवृत्ती महाराज कापसे यांची शासना तर्फे भ्रष्टाचार निर्मुलन समिती वर नियुक्ती

35

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.8डिसेंबर):-वारकरी संप्रदायाचे एक निष्ठावंत वारकरी व अभ्यासु निष्काम प्रवचन किर्तनकार व महाराष्ट्र वारकरी महामंडळ नाशिक जिल्हासल्लागार तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष: हभपश्री निवृत्ती महाराज कापसे गणेशगांवकर यांची महाराष्ट्र शासनाच्या उत्तर महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मुलन समितीवर विभागीय आयुक्त नाशिक श्री.राधाकृष्ण गमे सो.यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे. तसे नियुक्तीचे पत्र तहसिलदार श्री.अनिल दौंडे सो.यांनी नुकतेच हभपश्री.निवृत्ती महाराज कापसे यांना दिले आहे.

त्यांचे निवडीचे ना.श्री.छगन भुजबळ सो.ना.श्री.नरहरी झिरवाळ,वारकरी महामंडळ जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर,रेशन दुकानदार श्री. बापुसो.आहेर मांडवडकर, जनविकास फाऊंडेशन अध्यक्ष व राष्ट्रवादी नाशिक शहर उपाध्यक्ष श्री..बाळासाहेब जाधव, वारकरी महामंडळ युवासमिती शहराध्यक्ष हभपश्री धनंजय रहाणे यांनी त्यांचे निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन करुन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती वर ही संचालक म्हणुन काम करतांना हभपश्री निवृत्ती महाराज कापसे यांनी चांगली सेवा करुन कामाचा ठसा उमटवला आहे.अशी प्रतिक्रिया हभपश्री. आण्णासाहेब महाराज आहेर यांनी दिली आहे