चिमुर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

31

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमर(दि.8डिसेंबर):-महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा शाखा चिमुरच्या वतीने श्री संतशिरोमणि संन्ताजी जगनाडे महाराज यांची 396 वी जयंती संताजी चौक, चावड़ी मोहल्ला चिमुर येथे साजरी करण्यात आली.

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे पटशिष्य, संत तुकाराम महाराज यानी लीहलेल्या गाथा इंद्रायणी नदित भट्टानी पाण्यात बुडविल्यानंतर अवघ्या 13 दिवसात गाथा जश्याच्यातषया लिहनारे संत शिरोमणि संन्ताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा शाखा चिमुरच्या वतीने नियोजित संताजी सभागृह येथे सेवानिवृत प्राध्यापक महादेव पिसे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा च्या वतीने नियोजित संताजी सभागृहात झालेल्या कार्यक्रमस प्रांतीक चंद्रपुर विभागीय सचिब संजय खाटीक, शिक्षक भारतीचे जिल्ह्याध्यक्ष भाष्कर बावनकर, चिमुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्यवस्थापक प्रदीप बंडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोषाध्यक्ष कवडू लोहकरे, राजू हिंगणकर, प्रांतीक युवा आघाडी चंद्रपुर विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते, जिल्ह्याध्यक्ष उमेश हिंगे, उपाध्यक्ष कवडू कामडी, किशोर येंळने,सुरेश बंडे, पंकज बंडे, नीरज बंडे, सूरज बंडे,व बहुस्नखेने समाज बांधव उपस्तित होते.