दुचाकी गाडीचे पाठी मागील टायर अचानक फुटल्याने चुमकल्याचा जागीच ठार

29

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.8डिसेंबर):-चलत्या दुचाकी चे पाठी मागील टायर अचानक फुटल्याने दुचाकी वरील बसलेले चौघेजण रस्त्यावर अपटल्याने झालेल्या अपघातात चिमुकला मुलगा जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार दि.8 रोजी दुपारी पाचच्या सुमारास पांढरवाडी फाटा येथे घडली.

या बाबत अधिक माहिती अशी की, वडगाव ढोक तांडा येथील गबर आडे हे मंगळवार दि.8 रोजी आपल्या कुटूंबासह गेवराई बायपास वरून दुचाकी क्रमांक एम.एच 21- 5453 या गाडीवरून ववीता आडे, सोहम व पियुष आडे हे चौघे जण जात असताना बायपास वरील पांढरवाडी पुलावर आले असता चलत्या दुचाकीचे पाठी मागील टायर फुटल्याने दुचाकी वरील चौघे ही रोडवर आपटले यात पियुष आडे हा चिमुकला जागीच ठार झाला.

त्यांना ताबडतोब प्राथमिक उपचार करण्यासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन पुढील उपचारासाठी बीड हालवित आले. परंतु पियुष आडे हा जागीच गेला होता. सदरील घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. पियुष आडे या चिमुकल्यांच्या मृत्यु मुळे वडगाव ढोक तांड्यावर हळहळ व्यक्त केली जात आहे.