टेभूर्णी येथील कुर्डुवाडी रोडवरील उड्डाण पुलाजवळील रस्त्याची दुरावस्था

30

✒️नागेश खुपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.9डिसेंबर):-टेभूर्णी वरून कुर्डुवाडीला जात असताना पुणे सोलापूर रोडचा उड्डाण पुल लागतो. त्या पुलापासून कुर्डुवाडीला जाणारा रस्ता खुपच खराब झाला आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला हाॅटेल आहेत, आणि या हाॅटेलांमध्ये जे लोक थांबतात त्याची वाहने रस्त्यावरच उभी असतात.

सध्या ऊस कारखाने चालू आहेत. तालुक्यातील दोन्ही मोठे कारखाने याच रस्त्यावर आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणार्या वाहनांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची लवकरात लवकर दुरूस्ती व्हावी अशी नागरीकांची मागणी आहे.