गजानन गोपेवाड यांना उपक्रमशील शिक्षक सन्मान

35

✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

यवतमाळ(दि.9डिसेंबर):-जि.प. केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा येथील पदवीधर शिक्षक गजानन गोपेवाड हे गेली चार वर्षे सतत व अविरत पणे विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रात नव नवीन शैक्षणिक उपक्रम राबविले गेले त्यांनी अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नवोपक्रमशील शिक्षकांसाठी शैक्षणिक व्यासपीठ संपूर्ण महाराष्ट्रात उभे केले आहे.

ते फाउंडेशन चे राज्य समन्वयक आहे, , याचीच दखल घेऊन शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर जि, कोल्हापूर तर्फे उपक्रम शील शिक्षक सन्मान हा बहुप्रतिष्ठेचा पुरस्कार सन 2020 हा संस्थेच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त गजानन गोपेवाड यांना बहाल करण्यात आले आहे.

गजानन गोपेवाड यांनी ह्या यशाचे श्रेय मा, मिलींद कुबडे, मा, नितीन भालचक्र मा दिपक मेश्राम यांना दिले.सर्व महागांव शिक्षका मध्ये आनंद व्यक्त केला जात आहे, मा, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी , केंद्र प्रमुख व शाळेचे मुख्याध्यापक यांनी कौतुक केले आहे.