बीड जिल्ह्यातील 57 लाख वृक्षलागवडीची झाडाझडती होणार

33

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.9डिसेंबर):-फडणवीस सरकारच्या काळात राज्य शासनाने 33 कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत राज्यभरात मोहिम राबविली होती. यात जिल्ह्यात 57 लाख 60 हजार 350 वृक्षलागवड झाल्याची वनविभागाकडे नोंद आहे. आता याच वृक्षलागवडीची झाडाझडती होणार आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

फडवणीस सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवर हे वनमंत्री होते. त्या काळात बीड जिल्ह्यात वनविभागाने विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या नेतृत्वाखाली वनविभाग, सामाजिक वनीकरण या विभागांसह 46 शासकीय यंत्रणांच्या साहाय्याने वृक्षलागवड करण्यात आली होती.

त्यावेळी वनविभाग, सामाजिक वनीकरण वगळता इतर यंत्रणांनी केवळ ‘फोटोसेशन’ केले होते. दरम्यान, आता झाडाझडती होऊन वृक्षांचे मुल्यांकन झाल्यास 46 शासकीय यंत्रणातील अर्थात सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी अडचणीत येऊ शकतात. परंतू, तब्बल 57 लाख वृक्षांची चौकशी आणि सर्वच विभागांशी निगडीत विषय असल्याने चौकशी होईल असे सध्यातरी दिसून येत नाही.