पहिल्या टप्प्यात 15 हजार डॉक्टर्स व स्टाफचे लसीकरण

96

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

बीड(दि.9डिसेंबर):-जिल्ह्यातील शासकीय व खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील १५ हजार कार्यरत डॉक्टर आणि स्टाफचे पहिल्या टप्प्यातील कोरोना बाबत लसीकरण करण्यात येणार आहे. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक निर्देशांकानुसार राष्ट्रीय प्रणालीवरील कार्यवाहीसाठी माहिती तातडीने पूर्ण करावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले. कोरोना लसीकरण बाबत जिल्हा कृती समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू एच ओ) चे समन्वयक वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल गायकवाड, (आय एम ए) चे उपाध्यक्ष डॉ अनुराग पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक सूर्यकांत गीते, पोलीस निरीक्षक हेमंत मानकर , जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यासह स्वराती वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आरोग्य विभागातील अधिकारी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुंभार म्हणाले, जिल्ह्यात वैद्यकीय सेवेतील अधिकारी-कर्मचारी तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांच्याकडील स्टाफ यांच्या कोरोना लसीकरणाबाबत पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे.