मटा श्रावणी क्वीन आयुषी भावे घेऊन आली महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली “लावणी”

74

✒️विजय कांबळे(विशेष प्रतिनिधी)मो:-8454021607

मुंबई(दि.10डिसेंबर):-“मटा श्रावणी क्वीन २०१८” व “झी युवा डान्स क्वीन २०२०” आयुषी भावे सादर करीत आहे आणि सप्तसुर म्युझिक प्रस्तुत आणि साईनाथ राजाध्यक्ष निमित्त घेऊन येत आहे महाराष्ट्र प्रसिद्ध असलेली लावणी “या गावचं की त्या गावचं” आयुषी भावे पहिल्यांदाच लावणीच्या साह्याने दमदार पदार्पण करून चित्रपट सृष्टीत दाखल होत आहे. आयुषी हि मुंबईकर असुन सध्या ती आपले शिक्षण एम. ए (Sociology), मुंबई विद्यापीठातून पुर्ण करत आहे. आयुषीला लहानपणापासून नाचगाण्याची आवाड असल्याने सतत स्पर्धेत आवर्जुन भाग घेते. नशिबाने साईनाथ राजाध्यक्ष याने लावणी गाण्यांची संधी दिल्याने तीला अतिशय आनंद होत आहे.

आयुषीने या लावणी गाण्यासाठी अतिशय मेहनत घेऊन लावणी नृत्य पार पाडली. आयुषीला लावणी नृत्य बद्दल सुंदर मार्गदर्शन करणारे व शिकवणारे संतोष भांगरे आहेत. लावणीचे गाण्याचे बोल स्वप्नजा लेले हिने गायले आहे. लावणीचे गीतकार राजेंद्र वैद्य आहेत. आयुषीला लावणी नृत्य करून अतिशय आनंद होत आहे. तसेच तीने मटा श्रावणी क्वीन व झी युवा डान्स क्वीन आणि आता लावणी क्वीन म्हणुन तीची ओळख होण्यास काहीही हरकत नाही.

ती आपल्या जादुई लावणी नृत्यानी प्रेक्षक रसिकांचे नक्कीच मन जिंकेल यात शंका नाही. हि लावणी साधी पारंपरिक व मनमोहक पध्दतीत करण्यात आली आहे. “या गावचं की त्या गावचं” लावणी गाण रसिक प्रेक्षकांसमोर येत्या १०.१२.२०२० रोजी युट्युब चॅनल व टीव्हीवरील सर्व मराठी चॅनलवर सादर होणार आहे. युट्युब चॅनल वर हि लावणी नक्की पाहुन सबस्क्राइब करून आपले महत्त्वाचे कमेट करायला विसरू नका.